पिंपरीत चार मालवाहू ट्रकवर अज्ञात हल्लेखोरांची दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:06 IST2019-02-22T12:59:37+5:302019-02-22T13:06:55+5:30
पिंपरी चिंचवड परिसरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. ही तोडफोड दहशत माजविण्यासाठी करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून येते

पिंपरीत चार मालवाहू ट्रकवर अज्ञात हल्लेखोरांची दगडफेक
पिंपरी : नेहरूनगर येथे उभ्या केलेल्या चार मालवाहक ट्रकवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. तोडफोड करुन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही घटना गुरुवारी रात्री पिंपरी, नेहरुनगर येथील संतोषीमाता चौकात घडली.
याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पिंपरी नेहरुनगर येथील संतोषी माता चौकात मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या चार ट्रकवर दगडफेक केली. काचा फोडल्या, तोडफोड केली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करत आहेत.