पदपथावरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 07:33 PM2019-11-27T19:33:06+5:302019-11-27T19:36:13+5:30

सुरक्षेचा प्रश्न..

Unparalleled parking on the foothpath, pedestrian disturbance | पदपथावरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल

पदपथावरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल

googlenewsNext
ठळक मुद्देभर रस्त्यातून करावी लागते ये-जा, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रासपादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काचा असणारा पादचारी मार्ग बंद

पराग कुंकूलोळ - 
चिंचवड : चिंचवड स्टेशन परिसरात पादचारी मार्गावर पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी भर रस्त्यातून ये-जा करावी लागते. परिणामी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्य रस्त्यावर अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या भागात परिस्थिती गंभीर झाली आहे. या भागात नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना करून त्वरित समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काचा असणारा पादचारी मार्ग बंद झाला असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागते. याच परिसरातील महावीर चौकातही परिस्थिती गंभीर आहे. आनंदनगरकडे जाण्यासाठी वाहनचालक विरुद्ध दिशेने जातात. यामुळे येथे वाहतुकीचा खोळंबा ही नित्याचीच समस्या झाली आहे. वाहतूक पोलिसांसमोर हा सर्व प्रकार होत असूनही वाहतूक शाखेचे कर्मचारी या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत.
ग्रेड सेप्रेटरमध्ये प्रवासी वाहने थांबविली जातात. येथून अनेक प्रवासी जीवधोक्यात घालून रस्ता ओलांडतानाचे वास्तव दिसत आहे. या मार्गावर वाहने थांबविण्यास बंदी असूनही हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. यामुळे या भागात अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत. येथे वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. 
सायंकाळी येथील महावीर चौकात वाहतूककोंडी होते. लांबलचक वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक वाहतुकीस अडथळा ठरत आहे..
...............
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा
चिंचवड स्टेशन येथून अवैध प्रवासी वाहतूक करण्यात येते. अशा वाहनचालकांकडून भर रस्त्यात बेशिस्त पार्किंग केली जाते. पुणे-मुंबई महार्गावर भर चौकात पीएमपीएमएलचा बसथांबा असून, त्याच्यासमोरच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. तसेच काही रिक्षाचालकही त्यांच्या रिक्षा येथे बेशिस्तपणे पार्किंग करतात. त्यामुळे येथे 

अवजड वाहनांमुळे कोंडीत भर 
चिंचवड स्टेशन येथून आकुर्डीकडे जाणारी वाहने सिग्नलवरून मोठ्या संख्येने जात असल्याने या चौकात वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यात अवजड वाहनांची भर पडते. अवजड वाहनांमुळे येथे वाहतूककोंडी होते. तसेच या अवजड वाहनांमुळे अपघात होऊन पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. 
........
आनंदनगर भागाकडे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर नियमित कारवाई होत नसल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांना धाक नसल्याचे वास्तव समोर दिसत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या भागात नियमित दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. दिवसेंदिवस या भागात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
.........
४चिंचवड स्टेशन येथे पदपथांवर काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. टेबल ठेवून विविध वस्तूंची विक्री केली जाते. त्यामुळे या पदपथांचा पादचाऱ्यांना वापर करता येणार नाही. या विक्रेत्यांच्या दुचाकी तसेच इतर वाहनेही पदपथांवर पार्किंग करण्यात आल्याचे दिसून येते. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Unparalleled parking on the foothpath, pedestrian disturbance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.