उद्योगनगरीत असुरक्षित माहिती अधिकार कार्यकर्ते, माहितीचा गैरवापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:44 AM2018-11-12T00:44:57+5:302018-11-12T00:45:11+5:30
माहितीचा गैरवापर : अधिकाऱ्यांऐवजी ठेकेदारच घेताहेत पुढाकार
पिंपरी : माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविणाºया कार्यकर्त्याला माहिती देण्यास अधिकारी बांधील असतात़ मात्र अधिकाºयांऐवजी अर्जदाराशी संपर्क साधण्यास ठेकेदारच पुढाकार घेत आहेत. या प्रकारामुळे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचे संगनमत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्युत महावितरणच्या अधिकाºयांकडून घडलेल्या
प्रकाराची तक्रार राहुल कोल्हटकर यांनी दिली आहे. याप्रकरणी कोल्हटकर यांनी पोलिसांकडेसुद्धा तक्रार नोंदवली आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत कोल्हटकर यांनी मोशी, प्राधिकरण येथील व्यावसायिक इमारतीला दिलेल्या वीज जोडाबाबत माहिती मागवली. रीतसर लेखी अर्ज देऊन अधिकाºयांकडे माहिती मागितली. वीज जोडसाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून ते वीजजोडणी पूर्ण होईपर्यंतचा कार्यअहवाल मिळावा, अशी मागणी रास्ता पेठ पुणे येथील विद्युत महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली. चार महिने उलटले, तरी माहिती दिली गेली नाही. अखेर १२ सप्टेंबरला विलंबाने माहिती देण्यात आली. विचारलेल्या प्रश्नांची विसंगत उत्तरांसह माहिती देण्यात आली. त्यामुळे पुन्हा ही माहिती मिळण्यासाठी नव्याने अर्ज दाखल केला. आकुर्डी विद्युत महावितरण कार्यालयातून २४ आॅक्टोबरला मोबाइलवरून संपर्क साधून माहिती घेऊन जाण्यास सांगण्यात आले. अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून माहिती घेऊन जाण्यास सांगितले. चलन भरणा विभाग बंद असल्याने चलन भरले नाही, असे कोल्हटकर यांनी अनोळखी व्यक्तीस सांगितले. रात्री उशिरा साडेनऊच्या सुमारास अर्जदारास आणखी एका अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधून आपणास हवी असलेली माहिती मिळाली का, अशी विचारणा केली. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अनोळखी व्यक्ती संपर्क साधत असल्याने कोल्हटकर यांना धक्का बसला.
माझा मोबाइल क्रमांक आपणास कोणी दिला? असा प्रश्न संबंधितास विचारले असता, विद्युत वितरण कार्यालयातील अधिकाºयांनी क्रमांक दिला असल्याचे अनोळखी व्यक्तीने सांगितले.
कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता : अदखलपात्र गुन्हा
४माहिती अधिकारात मागवली जाणारी माहिती संबंधित अर्जदाराशिवाय अन्य कोणाला देणे अपेक्षित नसते. अधिकाºयांना रीतसर अर्ज दिल्यानंतरही तिºहाईत व्यक्तीला माहिती दिली जाते. तिºहाईत व्यक्ती माहिती अधिकारात माहिती मागविणाºया अर्जदाराशी थेट संवाद साधते. अधिकाºयांऐवजी ठेकेदार माहिती अधिकारात माहिती मागविणाºयांशी संपर्क साधतात. माहिती अधिकारांतर्गतची गोपनीय मााहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. ही बाब माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे कोल्हटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.