लोकवर्गणीचा समाजासाठी विनियोग करा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:42 AM2017-08-12T02:42:38+5:302017-08-12T02:43:12+5:30

गणेशोत्सवासाठी लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीचा उपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी केले.

Use the community for community class | लोकवर्गणीचा समाजासाठी विनियोग करा  

लोकवर्गणीचा समाजासाठी विनियोग करा  

Next

लोणावळा : गणेशोत्सवासाठी लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीचा उपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी केले.
स्वातंत्र्यदिन, दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील पदाधिकारी व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी शिवथरे बोलत होते. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नायब तहसीलदार आर. एल. कांबळे, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, वीजवितरणचे उप कार्यकारी अभियंता मुकुंद तेलके उपस्थित होते.
लोणावळ्यातील गणेश विसर्जन मार्गावरील लोंबलेल्या विजेच्या तारा वीजवितरण कंपनीने अनंत चतुर्थीपूर्वी काढून घ्याव्यात. गणेश विसर्जनासाठी टाटा कंपनीने इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शहराध्यक्षा जाधव यांनी केली. शहरात नवीन भुयारी गटार योजना राबवून नदीपात्रात सोडले जाणारे ड्रेनेज बंद करत नदीपात्र स्वच्छ व सुंदर केले जाणार आहे. याकरिता प्रकल्प सल्लागार नेमण्यात आला आहे. गणेशोत्सवापूर्वी तुंगार्ली गावाच्या रस्त्याची डागडुजी केली जाईल. पावसाळा संपताच नांगरगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या बाजूचा रस्ता बनविणे व इंद्रायणी नदीच्या पुलाचे रुंदीकरण ही कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
नायब तहसीलदार कांबळे म्हणाले, सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. वीजवितरणचे अधिकारी तेलके यांनी गणेश उत्सवात दहा दिवस शहरात कोठेही वीज बंदचे विघ्न येणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ, असे आश्वासन देताना गणेश मंडळांना एका दिवसात वीज कनेक्शन देऊ असे सांगितले. मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे बाजूला काढत मार्ग मिरवणुकीसाठी मोकळा करणे, नदीपात्रावर व मार्गावर पुरेशी वीज व्यवस्था, दक्षता पथक, आप्तकालीन पथक, रस्ते दुरुस्ती ही सर्व कामे पूर्ण केली जातील. तसेच पोलिसांच्या सूचनांप्रमाणे इंद्रायणी नदीकाठच्या गार्डनमध्ये विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार करणार आहोत.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षी भेडसावणाºया प्रश्नांची आठवण अधिकाºयांना करून दिली.

शिस्तबद्ध मंडळांना रोख बक्षिसे
गणेश उत्सव काळात बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत नियमांचे पालन करून आदर्शवत गणेश उत्सव साजरा करणाºया शिस्तबद्ध मंडळांना अनुक्रमे दहा, साडेसात व पाच हजार रुपयांची रोख बक्षिसे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी सांगितले़

सीसीटीव्ही बसवा : मंडळांना सूचना

पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी गणेश मंडळांना सुरक्षेबाबत सूचना देताना सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली. ांडळांनी धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारणे, ध्वनिप्रदूषण होणार नाही यांची दक्षता घेत स्पिकरचा आवाज ठेवावा़ डिजे व डॉल्बीला बंदी असल्याने कोणी डिजे-डॉल्बीचा वापर करू नये, गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा न करता लहान मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, विसर्जन मिरवणुकीत चांगली सुस्थितीमधील वाहने वापरावीत, मानाच्या गणेश मंडळांनी रांगेतील इतर मंडळांचे बाप्पा देखील रात्री बारापूर्वी विसर्जित होतील याची खबरदारी घ्यावी़ स्वयंसेवकांना ओळखपत्र द्यावीत, मूर्तीची सर्वतोपरी काळजी घ्यावी, मिरवणुकीत गुलाल उधळू नये व उधळल्यास दुसºयाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.

डीजे लावणाऱ्यांवर फौजदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
कामशेत : या वर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त व गणेश मंडप परिसरात रात्रीचा चालणारा जुगारमुक्त करणार आहे. मंडळांनी डीजे सिस्टीमवाल्यांना सुपारी दिली असेल, तर ती रद्द करावी अन्यथा संबंधित मंडळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी खडसावून सांगितले. कामशेत पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळ पदाधिकाºयांची बैठक गुरुवारी झाली. ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी डीजे, डॉल्बी सिस्टीमचा वापर करू नये. मंडळांनी ठाण्यात पदाधिकाºयांची नावे नोंदणी केल्यानंतरच ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र देतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी आय. एस. पाटील यांनी दिली. अधिकाºयांनी गणेशोत्सवादरम्यान घ्यावयाची काळजी व उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले.
ठाण्याच्या हद्दीत कामशेत शहरासह ४३ गावे असून, २१ ग्रुप ग्रामपंचायती आहेत. ७५ गणेशोत्सव मंडळे आहेत. कामशेतमध्ये १५ तर इतर गावांत ६० सार्वजनिक गणपती मंडळे आहेत. ग्रामीण भागातील २२ गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना पूर्वापार चालत आली आहे. कामशेत शहरात पाच दिवसांनी विसर्जित होणारे चार गणपती, सात दिवसांनी विसर्जित होणारे दोन गणपती व दहा दिवसांनी विसर्जित होणारे नऊ गणपती आहेत.
दहीहंडी, गणपती व बकरी ईद उत्सव काळात कायद्याविरोधात वर्तन झाल्यास संबंधित मंडळ पदाधिकाºयांना जबाबदार धरले जाऊन कडक कारवाई केली जाईल.गणेश विसर्जनाची शेवटची वेळ रात्री १०ची मंडळांनी पाळावी. विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्ती ठेवण्यात येणाºया गाडीची तपासणी करून घ्यावी. मंडप वाहतुकीस अडथळा ठरणार नाही याची काळजी घ्या. भारनियमन काळात मंडपात पर्यायी व्यवस्था ठेवावी. आदी सूचना शिवथरे यांनी केल्या.

ग्रामपंचायत प्रशासनाला विसर्जन घाटावर लाईटची सोय करावी, विसर्जन घाटाची दुरुस्ती करून घ्यावी. विसर्जनासाठी उत्तम पोहणाºया ठरावीक स्वयंसेवकांना ठेवावे. गणेशोत्सव संपेपर्यंत पोलीस पाटलांनी गाव सोडून जाऊ नये. गणेश विसर्जन शांततेत होईल, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
सरपंच सारिका शिंदे, सदस्या सारिका घोलप, पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस पाटील रोहिदास शिंदे, शंकर शिंदे, तानाजी दाभाडे, वसंत काळे, संतोष काळे, रमेश कदम, प्रकाश गायकवाड, रोहिदास वाळुंज, विकास गायकवाड, प्रतीक टाटिया, महेंद्र भाटी आदी उपस्थित होते. संतोष घोलप यांनी आभार मानले.

Web Title: Use the community for community class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.