जातीवाचक शब्द वापरल्यावरून तळवडे, त्रिवेणीनगरच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:56 PM2017-11-25T14:56:58+5:302017-11-25T16:04:19+5:30

कर्मचारी महिलेला जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल तळवडे, त्रिवेणीनगर येथील सद्गुरू हॉस्पिटलचे  डॉक्टर सुशिल सिंघवी यांच्याविरूद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

From the use of controversial words, register crime on doctor in Talawade | जातीवाचक शब्द वापरल्यावरून तळवडे, त्रिवेणीनगरच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

जातीवाचक शब्द वापरल्यावरून तळवडे, त्रिवेणीनगरच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देपूर्वकल्पना न देता पगारातून दरमहा कपात केली जात होती काही रक्कमशुक्रवारी डॉ. सिंघवी यांच्याविरूद्ध निगडी पोलिसांकडे गुन्हा दाखल

पिंपरी : आर्थिक शोषण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या रूग्णालयातील कर्मचारी महिलेला जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल तळवडे, त्रिवेणीनगर येथील सद्गुरू हॉस्पिटलचे  डॉक्टर सुशिल सिंघवी यांच्याविरूद्ध अ‍ॅट्रोसिटीचा (दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत) गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी हा गुन्हा दाखल झाला असून निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 
रूपीनगर येथील डॉ. सिंघवी यांच्या सद्गुरू हॉस्पिटलमध्ये ही महिला काम करते. पगारातून पूर्वकल्पना न देता दरमहा काही रक्कम कपात केली जात असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने ही बाब आईला सांगितली. आईसह ती डॉक्टरांकडे याचा जाब विचारण्यास गेली. त्यावेळी कर्मचारी महिला पगाराबाबतचा जाब विचारण्यास आली. याचा राग आल्याने डॉक्टरांनी तिला जातीवाचक आणि अवमानकारक शब्द वापरले. त्यामुळे या महिलेने दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या आधारे डॉ. सिंघवी यांच्याविरूद्ध निगडी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: From the use of controversial words, register crime on doctor in Talawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.