वाकडमध्ये सुरू आहे गार्इंच्या चा-यासाठी भिशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:27 AM2017-07-31T04:27:41+5:302017-07-31T04:35:02+5:30
पैसे साठविण्यासाठी भिशी सुरू केली जाते. पण दान करण्यासाठी भिशी चालविली जात असेल, तर आश्चर्यच वाटेल ना, हो पण हे सत्य आहे.
बेलाजी पात्रे
वाकड : पैसे साठविण्यासाठी भिशी सुरू केली जाते. पण दान करण्यासाठी भिशी चालविली जात असेल, तर आश्चर्यच वाटेल ना, हो पण हे सत्य आहे. भोसरी पांजरपोळ गोरक्षा संस्थेला थेरगाव डांगे चौक आणि वाकडमधील श्री चामुंडा राजस्थानी व्यापारी असोसिएशनच्या भिशीतून दर पंधरा दिवसांनी चारा दान करण्यात येत आहे. त्यामाध्यातून व्यापाºयांनी वेगळा आदर्श ठेवला आहे.
सर्व व्यापारी बांधव सभासदांकडून दर चौदा दिवसांनी पाचशे रुपये जमा केले जातात आणि ज्याच्या नावाची चिट्ठी निघेल, त्याने मात्र दोन हजार रुपये द्यायचे असे पैसे जमा करून अमावस्या आणि पौर्णिमेला गायींसाठी चारा खरेदी केला जातो आणि मग सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चिल्या पिल्ल्यांसह मोटारी भरून भोसरी पांजरपोळच्या दिशेने रवाना होतात. पांजरपोळ येथे जाऊन मनोभावे सर्व गायींना तो चार चारला जातो. गेल्या चार महिन्यांपासून हा स्त्युत्य उपक्रम सुरूआहे.
नुकताच तब्बल तीन टन चारा (इलायती लसूण मेथी गवत) येथील तेराशे गायींना चारण्यात आला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष भुराराम भाटी, सुभाष सरोदे, हिम्मत भाटी, प्रकाश जैन, कैलास घोरपडे, मोहनलाल भाटी, अक्षय गायके, केसराम सीरवी, हिरालाल सीरवी, रमेशकुमार परमार, हिरालाल देवडा, कुमाराम चौधरी, पूर्णाराम चौधरी, प्रमोद देवासी, सोळंकी, शांताबाई भाटी, ममता सोळंकी, पुष्पा भाटी, ललिता परमार, गॅरी भाटी, नरभदा भाटी आदी उपस्थित होते.या भिशीत सध्या ३० सभासद आहेत. मात्र, हळूहळू सभासद संख्या वाढत आहे. राजस्थानी महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून या उपक्रमात हिरीरीने सहभागी होत आहेत.
आमावस्या व पौर्णिमेला हा उपक्रम राबविला जातो. श्री चामुंडा गोसेवा या भिशीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर चा-यासाठीची लगबग सुरू होते. सूचनांचे संदेश धडाडू लागतात आणि बघता बघता १७ हजार रुपये जमतात आणि मग सुरू होतो चा-याचा शोध़ प्रत्येक वेळी वेगवेगळा
म्हणजेच कडवळ, मका, घास, गवत, कडबा, बाजरी आदी चारा दिला जातो.