वडगाव नगर परिषद : विषय समिती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:58 AM2018-10-04T01:58:01+5:302018-10-04T01:58:33+5:30

स्थायीच्या अध्यक्षपदी मयूर ढोरे

Vadgaon Nagar Parishad: The subject committee selection is unconstitutional | वडगाव नगर परिषद : विषय समिती निवड बिनविरोध

वडगाव नगर परिषद : विषय समिती निवड बिनविरोध

Next

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या स्थायी समितीसह अन्य समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. स्थायी समितीच्या सभापतिपदी
नगराध्यक्ष मयूर ढोरे तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर यांची निवड झाली. तहसीलदार रणजित देसाई याच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. तळेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच विषय समितीसाठी नेमणूक झाल्या. या निवडी बिनविरोध झाल्या. निवडीनंतर सदस्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. या निवडीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून लागले होते.

इतर समित्या पुढीलप्रमाणे : स्थायी समिती सभापती मयूर ढोरे, पूजा वहिले, सायली म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, अर्चना म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर.
पाणीपुरवठा समिती सभापती अर्चना म्हाळसकर, सदस्य चंद्रजित वाघमारे, माया चव्हाण, दिनेश ढोरे, शारदा ढोरे़ क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती पूजा विशाल वहिले, सदस्य किरण म्हाळसकर, चंद्रजित वाघमारे, राहुल ढोरे, दशरथ केंगले़ स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य सभापती सायली म्हाळसकर, सदस्य राहुल ढोरे, विजय जाधव, दिनेश ढोरे, शारदा ढोरे.

नियोजन समितीतील सदस्य
नियोजन समिती सभापती प्रवीण चव्हाण, सदस्य प्रमीला बाफना, विजय जाधव, पूनम जाधव, किरण म्हाळसकर.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती दिलीप म्हाळसकर, सदस्य किरण म्हाळसकर, प्रमीला बाफना, राजेंद्र कुडे, चंद्रजित वाघमारे.
महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता भिलारे, उपसभापती दीपाली मोरे, सदस्य पूनम जाधव, प्रमीला बाफना, माया चव्हाण.

Web Title: Vadgaon Nagar Parishad: The subject committee selection is unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.