पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरीचे सत्र सुरूच ! तीन महागड्या दुचाकीसह सहा वाहने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 04:40 PM2020-10-29T16:40:42+5:302020-10-29T16:40:54+5:30

सहा दुचाकी चोरीला गेल्याच्या घटनांची विविध पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Vehicle theft session continues in Pimpri Chinchwad! Six vehicles including three expensive two-wheelers stolen | पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरीचे सत्र सुरूच ! तीन महागड्या दुचाकीसह सहा वाहने चोरीला

पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरीचे सत्र सुरूच ! तीन महागड्या दुचाकीसह सहा वाहने चोरीला

Next

पिंपरी : शहरात तीन महागड्या दुचाकीसह सहा दुचाकी चोरीला गेल्याच्या घटनांची विविध पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आयफिल इंजिनिअरिंग कंपनी समोरून दुचाकी चोरीला गेल्याची तजरार बंटी आनंदराव लिखितकर (वय ३२, रा. बोराटे वस्ती मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे. म्हाळुंगे खेड येथील वेरॉक इंजिनिअरिंग कंपनी जवळून एक लाख सात हजार रुपये किंमतीची बुलेट चोरीस गेल्याची फिर्याद श्रीयश कमलाकर थोरात (वय २३, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) यांनी दिली आहे.

चाकण मधील नाणेकरवाडी रानुबाई मळा येथून ९५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद गौरव गंगाराम भिसे (वय २२, नाणेकरवाडी खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. सोमाटणे भाजी मंडई समोरून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद अमोल बाळू शिंदे (वय ३३, लोणावळा, मावळ) यांनी दिली आहे. 

मुळशीतील सुस येथील मर्सिडीज बेंझच्या पार्किंगमधून १ लाख २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी हर्षल सुभाष पाटील (वय ३०, रा. तीर्थ टॉवर, सुस, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. देहूगाव येथील हगवणे वीटभट्टी येथून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार रमेश एकनाथ गवळी (वय ३८, विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिली आहे. 

Web Title: Vehicle theft session continues in Pimpri Chinchwad! Six vehicles including three expensive two-wheelers stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.