भुलभुलैयाला पालक पडतात बळी

By Admin | Published: December 28, 2015 01:24 AM2015-12-28T01:24:16+5:302015-12-28T01:24:16+5:30

‘नाव मोठं लक्षण खोटं’ या म्हणीचे यथार्थ दर्शन शहरातील काही ‘इंटरनॅशनल स्कूल’च्या माध्यमातून घडत आहे. त्यातून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे

The victim falls victim to the victim | भुलभुलैयाला पालक पडतात बळी

भुलभुलैयाला पालक पडतात बळी

googlenewsNext

पिंपरी : ‘नाव मोठं लक्षण खोटं’ या म्हणीचे यथार्थ दर्शन शहरातील काही ‘इंटरनॅशनल स्कूल’च्या माध्यमातून घडत आहे. त्यातून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. दर्जात्मक शिक्षण तर दूरच, मात्र पायाभूत सुविधांबाबतही या संस्था सक्षम नाहीत. इंटरनॅशनलच्या ‘भुलभुलैया’ला पालक बळी पडत आहेत. याकडे शिक्षण खात्याचे लक्ष नाही. याबाबत दाद मागायची कोणाकडे, हा प्रश्न आहे.
नॅशनल, इंटरनॅशनल असा शब्द इंग्रजी शाळांच्या नावापुढे लावला की, शाळा जागतिक दर्जाच्या झाल्या, असे फॅड शाळांमध्ये दिसून येत आहे. अशा शाळांच्या ‘इंटरनॅशनल’ या शब्दाचा अर्थच उमगला नाही. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये इंग्रजी माध्यमांच्या १४४ शाळा आहेत. त्यापैकी तळवडे, निगडी, प्राधिकरण, चिंचवडगाव, एमआयडीसी, सांगवी, रहाटणी, नेवाळेवस्ती, मोरवाडी, खराळवाडी, काळभोरनगर, वल्लभनगर या भागातील १३ शाळांनी आपल्या नावाभोवती इंटरनॅशनल स्कूल असे बिरूद लावले आहे.
इंटरनॅशनल शाळा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना पुरविते, अशी पालकांची धारणा आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासाच्या दृष्टीने प्रयत्नही केले जात नाहीत.
नावावरून शाळांकडे आकर्षित होऊ नये. नाव हे एक ब्रँड आहे, असे नाही. यासाठी पूर्ण शहानिशा करूनच पाल्याला शाळेत टाकायला हवे. गुणात्मक दर्जा कसा आहे, यावरून शाळेचे मूल्यमापन करावे. ही सर्व जबाबदारी पालकांची आहे, असे खडकीतील पालक मदन गाडे यांनी सांगितले.
शहरामध्ये शाळेचे नाव पाहूनच प्रवेश घेतला जातो. प्रवेशाच्या वेळी पालकांकडून मोठ्याप्रमाणात फी घेतली जाते. अनेकवेळा मोठ्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते. पण प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पाल्याची प्रगती पाहिली की आपण प्रवेश घेऊन मोठी चूक केल्याचे पालकांच्या लक्षात येते. पण वेळ आणि पैसा निघून गेलेला असतो. त्यामुळे अनेक पालक हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The victim falls victim to the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.