VIDEO - उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपामध्ये बंड
By Admin | Published: February 4, 2017 08:04 PM2017-02-04T20:04:40+5:302017-02-04T20:04:40+5:30
ऑनलाइन लोकमत पिंपरी, दि. 4 - वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणा-यांना उमेदवारी डावलून भाजपात आलेल्या आयारामांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात ...
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 4 - वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणा-यांना उमेदवारी डावलून भाजपात आलेल्या आयारामांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली, एक प्रकारे निष्ठावंत कायकर्त्यांचा बळी घेतला आहे. या अन्यायाविरोधात बंड पुकारण्याचा निर्धार भाजपातील नाराजांच्या गटाने व्यक्त केला.
राष्ट्रवादीरूपी भाजपा आणि निष्ठावंतांचा भाजपा असा या निवडणुकीतील संघर्ष राहील. असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राजू दुर्गे यांच्यासह नाराजांच्या गटाने व्यकत केला. भाजपा संपर्क कार्यालयाजवळ त्यांनी ठिय्या आंदोलन करून या प्रकाराचा निषेध नोंदवला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या स्वाक्षरीने फायनल झालेली भाजपाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची उमेदवार यादी मुंबईतुन येताना,स्थानिक पदाधिका-यांनी बदलली. अक्षरश: व्हाईटनर लावुन नावे बदलण्यात आली. वर्षानुवर्षे काम करणाºया पक्षाच्या उमेदवारांना या प्रकारामुळे जबरदस्त धक्का बसला.
मोरवाडी येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयाजवळ येऊन त्यांनी मनातील खदखद व्यकत केली. दुर्गे म्हणाले, ‘‘आपले घर राहिलेले नाही, आपल्या घरात आपणच पाहुणे झालो आहोत.’’ आलीबाबा चाळीस चोरांनी घेरले आहे. आपण शिवाजीचे मावळे बनून काम करायचे आहे. निष्ठावंतांना डवलून खासदारांच्या घरी धुणी, भांडी करणा-यांना उमेदवारी देण्यात आली. आयारामांना उमेदवारी दिली.
सर्व्हेक्षणाच्या आधारेच उमेदवारी दिली जाईल,असे सांगितले. मग नको त्यांना उमेदवारी दिली कशी? सव्हे्क्षणाची नौटंकी कशासाठी केली ? असे सवाल उपस्थित करण्यात आला. आपले अस्तित्व राहिलेले नाही. त्याचबरोबर पक्षाच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. राष्ट्रवादीरूपी भाजप तयार झाली असून आपल्याला या राष्ट्रवादीरूपी भाजपाविरोधात निष्ठावंतांच्या भाजपाची फळी उभी करावी लागणार आहे. निवडून आलो नाही तरी बेहत्तर आपले उपद्रव मुल्य दाखवून देऊ.
महिला आघाडी गेली कोठे?
पक्षाच्या कार्यक्रमांसाठी महिला जमा करायच्या असल्यास हक्काने ज्या पदाधिका-यांना महिला जमविण्यास सांगितले जायचे. काहीही करा, गर्दी जमली पाहिजे. असे सांगून ज्यांना राबवुन घेतले. त्या महिलांचा कोठेच विचार केलेला नाही. महिला आघाडीच्या शैला मोळक यांनाही उमेदवारी नाकारली. मोळक, तसेच रघुनंदन घुले यांच्या नावाने आलेल्या पक्षाच्या एबीफॉर्मवर खाडाखोड करण्यात आली. त्यांच्यासह अन्य दहा जणांची नावे उमेदवारी यादीतून ऐनवेळी गायब झाली. एकीकडे नोटाबंदी करण्यात आली. तर दुसरीकडे पैसे देऊन उमेदवारी दिली. असा आरोप महिला मोर्चाच्या वैशाली मोरे, आशा काळे यांनी केला.
https://www.dailymotion.com/video/x844qhr