खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे विजया रहाटकर यांनी केले सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 07:57 PM2019-07-24T19:57:44+5:302019-07-24T20:00:08+5:30

अत्याचार करुन खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

vijaya rahatkar visited the victims home | खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे विजया रहाटकर यांनी केले सांत्वन

खून झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचे विजया रहाटकर यांनी केले सांत्वन

Next

पिंपरी : अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २३) पिंपळे सौदागर येथे झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बुधवारी (दि. २४) चिमुरडीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच तपासाची सद्यस्थिती पोलिसांकडून जाणून घेतली.  

पीडित कुटुंब पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर पत्राशेडमध्ये वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री साडेअकराला अडीच वर्षांची चिमुरडी आईसोबत झोपली होती. त्यावेळी अज्ञात आरोपीने अर्धवट उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या चिमुरडीला आरोपी उचलून घेऊन गेला. आईला जाग आल्यानंतर चिमुरडीची शोधाशोध करण्यात आली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही शोध सुरू केला. बुधवारी पहाटे पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीत चिमुरडीचा मृतदेह सापडला. लैंगिक अत्याचार करून चिमुरडीचा खून करण्यात आला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये आल्या होत्या. त्यांना या घटनेबाबत माहिती मिळाली असता त्यांनी पिंपळे सौदागर येथे जाऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडून तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली. आरोपींचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्याची सूचना केली.

Web Title: vijaya rahatkar visited the victims home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.