ग्रामप्रदक्षिणा न झाल्यास गावबंद
By admin | Published: July 8, 2015 02:22 AM2015-07-08T02:22:08+5:302015-07-08T02:22:08+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी ग्रामप्रदक्षिणा न करता पालखी थेट पालखीतळावर घेऊन जाण्याच्या निर्णयावर वाल्हे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
वाल्हे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी ग्रामप्रदक्षिणा न करता पालखी थेट पालखीतळावर घेऊन जाण्याच्या निर्णयावर वाल्हे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
सासवड येथे सोमवारी (दि. १२ ) होणाऱ्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास मंगळवारी (दि. १३) संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय आज (दि. ७) झालेल्या ग्रामसभेमध्ये एकमुखाने घेण्यात आला.
सन १९२६पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरा नदीवर पूल नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिरवळमार्गे जात होता. त्यामुळे वाल्हेतील रहिवाशी नीतू मांडके या भाविकाने स्वखर्चाने दगडी पूल बांधून दिला होता.
त्यानंतर १९२७ पासून हा सोहळा पुरंदर तालुक्यातून मार्गक्रमण करण्यास सुरवात झाली होती. त्यांच्या या दातृत्वाची दखल घेत तत्कालीन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कमिटीने मांडके यांच्यासह गावकऱ्यांना खांद्यावरून पालखी घेऊन ग्रामप्रदक्षिणा घालण्याचा मान उपलब्ध करून दिला होता.
ही ग्रामप्रदक्षिणेची परंपरा
खंडित करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. हा वाल्हेकरांचा अपमान असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाल्हेकरांनी व्यक्त केल्या असून गाव बंदचा इशारा दिला आहे. सभेला सरपंच, उसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)