गावोगावी ध्वजवंदन उत्साहात

By Admin | Published: January 28, 2017 12:19 AM2017-01-28T00:19:56+5:302017-01-28T00:19:56+5:30

लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित

In the villages, flag hoax | गावोगावी ध्वजवंदन उत्साहात

गावोगावी ध्वजवंदन उत्साहात

googlenewsNext

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गवळीवाडा येथे काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक महम्मद मणियार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या वतीने रमेश नय्यर यांच्या निवासस्थानी नगरसेविका अंजना कडू व शहराध्यक्ष राजु बोराटी यांच्या हस्ते तर भाजपाच्या वतीने नांगरगाव येथील मगनलाल चिक्की कारखान्यांच्या आवारात काकी आगरवाल, शहराध्यक्ष बाबा शेट्टी, भरत हारपुडे, अशोक आगरवाल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व स. निरीक्षक संदीप येडे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
श्रीराम क्रीडा मंडळ गवळीवाडा व डायनॅमिक रेमिडीज् यांच्या वतीने नगर परिषदेच्या गवळीवाडा शाळेत मोफत ईसीजी, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकर, स्त्रीरोग, त्वचारोग निदान व मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ११० जणांची तपासणी करण्यात आली. श्री आँल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी, पुष्कर जैन युवक मंडळ व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यांच्या वतीने लोणावळ्यातील जैन मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मावळ वार्ता फाउंडेशनच्या वतीने जागो हिंदुस्थानी ही शाळकरी मुले व नागरिकांचा समावेश असलेली रॅली मावळा पुतळा ते शिवाजी चौक दरम्यान आयोजित केली होती. शिवाजी चौकात देशभक्तीपर आधारित नृत्य स्पर्धा झाली.
चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपाध्यक्षा अ‍ॅड. अरुणा पिंजण, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, किसन नेटके, यदुनाथ डाखोरे, मदन सोनिगरा, अशोक शेलार, अली शेख, भाजप शहराध्यक्ष अ‍ॅड. कैलास पानसरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, मनसेचे अध्यक्ष विनोद भंडारी, महावीर बरलोटा, लायन्सचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, लहू शेलार आदी उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सीईओ सानप, उपाध्यक्षा पिंजण, सदस्य शेलार, नाईकनवरे, हाजीमलंग, खंडेलवाल यांच्या हस्ते सन्मानित केले. बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे यांना उपस्थित असतानाही बक्षीस वाटप करताना डावलल्याने चर्चेला उधाण आले होते.
बाजारपेठेतील सुभाष चौकात व्यापारी नरेश गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जावेदभाई सिकीलकर होते. बोर्डाच्या उपाध्यक्षा अरुणा पिंजण, माजी उपाध्यक्ष मदन सोनिगरा आदी उपस्थित होते.
चिंचोली येथील डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शिक्षण समिती अध्यक्ष ललित बालघरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांनी कवायत, देशभक्तीवर आधारित स्फूर्तिगीते सादर केली. स्पर्धांमधील विजेत्यांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. वृक्ष संवर्धनाबद्दल सात विद्यार्थ्यांना वृक्षमित्र पुरस्कार देण्यात आले. तुकाराम जाधव, सचिन जाधव, सुरेश गायकवाड, देवराम भेगडे, बाळासाहेब जाधव, वसंत भेगडे, सुरेश बालघरे , संतोष भेगडे, सोपान पानसरे आदी उपस्थित होते. सकाळी साडेसहा वाजता चिंचोली गावातून विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत प्रभात फेरी काढली होती. विद्यार्थ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला. रमेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी मुख्याध्यापिका कविता भट यांनी स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: In the villages, flag hoax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.