आचारसंहितेचा भंग; संघटनेवर गुन्हा
By admin | Published: October 22, 2016 03:53 AM2016-10-22T03:53:47+5:302016-10-22T03:53:47+5:30
बेकायदेशीररीत्या जमाव जमवून घोषणा दिल्यामुळे आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे कष्टकरी कामगार पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर
पिंंपरी : बेकायदेशीररीत्या जमाव जमवून घोषणा दिल्यामुळे आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे कष्टकरी कामगार पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरुवारी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ घडली़ या प्रकरणी विलास बाळासाहेब वाबळे (वय ५३ , रा़ पिंपळे गुरव्) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी कष्टकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररीत्या जमाव जमविला़ घोषणा देऊन सार्वजनिक शांततेचा भंग केला़ आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ७० ते ८० जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)
गोरगरिबांच्या हक्काचा घरकुल प्रश्न मार्गी लागण्यासाठी महापालिकेच्या दारात आंदोलन करण्यात आले़ महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आमच्या संघटनेवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्याल आला आहे़ - बाबा कांबळे, अध्यक्ष,
कष्टकरी पंचायत समिती