वाहतूक नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:49 AM2019-01-11T02:49:11+5:302019-01-11T02:49:30+5:30

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : निगडीत बेशिस्त वाहनचालकांमध्ये वाढ

Violation of traffic rules | वाहतूक नियमांचे उल्लंघन

वाहतूक नियमांचे उल्लंघन

Next

निगडी : बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम कायमच धाब्यावर बसविण्यात येतात. झेब्रा क्रॉसिंगचा नियमच माहिती नसल्यासारखे काही उद्दाम चालक झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करतात. मग रस्ता ओलांडायचा कसा, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली करणारे अनेक बेशिस्त वाहनचालक दररोज दिसतात. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया निगडीत असे बेशिस्त वाहनचालक मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. निगडीतील टिळक चौक, भक्ती शक्ती चौक या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या चौकातून भोसरी, तळवडे एमआयडीसी, तसेच चाकणकडे जाणाºया कामगारवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसेच ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी रोज या चौकातून मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. परंतु बहुतांश वाहनचालक झेब्रा कॉसिंगवर अथवा त्याहीपुढे आपले वाहन थांबवितात. त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहतूककोंडीतही वाढ झाली आहे. मात्र याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढºया रेषेवर चालकांनी थांबणे बंधनकारक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविणे आवश्यक आहे. यात सामाजिक आणि विविध संस्था, तसेच संघटनांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे.

ज्येष्ठांना त्रास : पादचाºयांची सुरक्षा धोक्यात

झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणे हा पादचाºयांचा हक्क आहे. अनेक वेळा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगजवळ थांबत नसल्याने पादचाºयांची त्रेधा उडते. त्यांना रस्ता ओलांडताना त्रास होत असतो. ज्येष्ठांसाठी तर ते दिव्य होऊन बसते. एक प्रकारे पादचाºयांच्या हक्कावर गदा आणल्यासारखे होते. सर्वच चालकांनी पादचाºयांच्या हक्काचे पालन करावे, तसेच पादचाºयांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

निगडीतील प्रत्येक चौकातील सिग्नलवर अनेकवेळा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगजवळ थांबत नसल्याने पादचाºयांचे हाल होत असतात. त्यांना रस्ता ओलांडताना त्रास होत असतो. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी. - सतीश कदम, निगडी

Web Title: Violation of traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.