मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पिंपरीत "ढोल वाजवा महाराष्ट्र सरकार जागवा"आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 08:09 PM2020-10-27T20:09:49+5:302020-10-27T20:11:04+5:30

गेली आठ महिने बंद असलेली मंदिरे भक्तांना दर्शनासाठी तातडीने खुली करण्यात यावी अशी मागणी

Vishwa Hindu Parishad agitation to open temples in Pimpri | मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पिंपरीत "ढोल वाजवा महाराष्ट्र सरकार जागवा"आंदोलन 

मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पिंपरीत "ढोल वाजवा महाराष्ट्र सरकार जागवा"आंदोलन 

googlenewsNext

पिंपरी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात जवळपास सात ते आठ महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. अनलॉक च्या टप्प्यात हळूहळू सर्व गोष्टी सुरु करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारमंदिरे उघण्याबाबत अद्यापही काही ठोस पावले उचलत नसल्याने विरोधी पक्ष भाजपासह विविध संघटना मंदिरे उघडावीत यासाठी आंदोलन करत आहे. याच धर्तीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर व मावळ परिसरात देखील 'ढोल वाजवा महाराष्ट्र सरकार जागवा' हे आंदोलन करण्यात आले. 

 पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात विश्व हिंदू परिषदवती मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू ''ढोल वाजवा महाराष्ट्र सरकार जागवा''  हे आंदोलन मंगळवारी( दि. २७) करण्यात आले.  गेली आठ महिने बंद असलेली मंदिरे भक्तांना दर्शनासाठी तातडीने खुली करण्यात यावी अशी मागणी यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. तसेच मंदिरांच्या आश्रयाने असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. गुरव, पुजारी, पुरोहित या वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे घंटानाद, शंखनाद करत भजन व आरती करून 'ढोल वाजवा, महाराष्ट्र सरकार जागवा' हे आंदोलन विविध ठिकाणी करण्यात आले

पिंपरी चिंचडमध्ये ही मोरया गोसावी मंदिर समोर आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री, विजय देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, अशोक यलमार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मातृशक्ती पालक, नंदकुमार कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष शरदराव इनामदार, बजरंग दल पिंपरी-चिंचवड जिल्हा संयोजक नाना सावंत, सहसंयोजक अभिजीत शिंदे, संभाजी बालघरे, सागर चव्हाण, जिल्हा गोरक्षा प्रमुख मंगेश नढे, साप्ताहिक मिलन प्रमुख कृष्णा वाघमारे उपस्थित होते. 

विश्व हिंदु परिषद बजरंग दल श्री क्षेत्र देहूगाव च्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर समोर आंदोलन केले. या वेळी संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिवाजी महाराज मोरे, विठ्ठल महाराज मोरे, रामनाना मोरे, चिंचवड विभाग बजरंग दल संयोजक संदेश भेगडे, निखिल पिंजण, ओमकार काळोखे, अमित मोरे, अशोक साकोरे,  अमित भेगडे, अजित काळोखे, शिरीष मोरे, मुकेश पाठक, दिपक अग्रवाल, मयुर हिंगे आदी उपस्थित होते.  
 

Web Title: Vishwa Hindu Parishad agitation to open temples in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.