पालिकेस स्वीडनच्या शिष्टमंडळाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:55 AM2017-10-16T02:55:04+5:302017-10-16T02:55:09+5:30
स्वीडनचे कौैन्सिल जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांनी शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस शुक्रवारी भेट दिली. महापालिकेच्या कामकाजाची, विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : स्वीडनचे कौैन्सिल जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांनी शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस शुक्रवारी भेट दिली. महापालिकेच्या कामकाजाची, विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीस उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, ह्यहह्ण प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सँडविक एशिया कंपनीचे एच.आर. सहर्ष डेव्हिड, पालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपअभियंता सुनील पवार उपस्थित होते.
आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी शिष्टमंडळास ह्यस्मार्ट सिटीह्ण व स्विडीश सीएसआरसाठी करावयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. नजीकच्या काळात सँडविक एशिया, एस.के.एफ इत्यादी स्विडीश कंपन्या व स्विडन सरकार यांच्या समवेत सहकार्य, तंत्रज्ञानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.