लोकसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड, प्रमाणपत्र, गॅझेट, सभावृत्तांताचे केले संकलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:14 PM2019-06-03T16:14:09+5:302019-06-03T16:15:23+5:30
व्हिजिटींग कार्डसह फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्ताचेही संकलन त्यांनी केले आहे.
पिंपरी : काही माणसे छंदवेडी असतात. यात विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद काही जणांना असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे लोकसेवकांच्या व्हिजिंटिंग कार्ड संकलित करण्याचा अनोखा छंद थेरगाव येथील अवलियाने जोपासला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य असलेल्या संभाजी बाळासाहेब बारणे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. व्हिजिटींग कार्डसह फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्ताचेही संकलन त्यांनी केले आहे. उद्योगनरीसाठी हा ऐतिहासिक दस्त आहे. तो भावी पिढीस प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास संभाजी बारणे यांनी व्यक्त केला आहे.
४ मार्च १९७० रोजी पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर २० मार्च १९७८ रोजी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. १९ ऑक्टोबर १९८२ रोजी महापालिका अस्तित्वात आली. महापालिकेची पहिली निवडणूक १९८६ मध्ये झाली. त्यानंतर २०१७ पर्यंत पंचवार्षिक निवडणुका झाल्या. १९७० ते २०१७ या कालावधीत नवनगरपालिका व महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचे व स्वीकृत सदस्य, नामनिर्देशित सदस्य तसेच नगरपिता, सदस्य, सभासद अशा विविध पदांवर कार्य केलेल्या लोकसेवकांच्या व्हिजिटींग कार्डचा संग्रह बारणे यांनी केला आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने १७ मे २०१९ रोजी जाहीर केली. तसे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांनी बारणे यांना प्रदान करून त्यांचा सन्मान केला आहे.
मॅक्सिमम कलेक्शन ऑफ व्हिजिटिंग कार्डस् ऑफ म्युनसिपल कापोर्रेशन या नावाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यात बारणे यांनी आजी-माजी नगरसेवकांच्या १२३२ व्हिजिटींग कार्ड, ७६८ फोटोग्राफ आणि २४४ प्रमाणपत्रांचा संग्रह केला आहे.
उपक्रमाविषयी माहिती देताना संभाजी बारणे म्हणाले, काही सदस्यांनी त्यांचे व्हिजिटींग कार्ड संदर्भ म्हणून मला दिले होते. या व्हिजिटिंग कार्डचे संकलन करण्याचे ठरविले. त्यावेळी माज्याकडे केवळ पाच टक्के व्हिजिटींग कार्ड होते. त्यानंतर संग्रह करण्याबाबत निश्चय करून नगरपालिका, महापालिका स्थापनेपासून आजपर्यंतची सर्व सदस्यांची व्हिजिटींग कार्ड, फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्त मिळविण्यासाठी पाठपुरावा केला.
पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून २०१२ व २०१७ मधील महापालिका सदस्यांचे निवडून आल्याचे प्रमाणपत्र माहितीचा अधिकार कायदयान्वये मिळविले. अनेक सदस्यांनी त्यांच्या माहितीचा व अनुभवाचा अनमोल खजिना शब्दरुपाने व कागदोपत्री मला दिला. त्याविषयी लवकरच पुस्तक प्रकाशन करून ती उद्बोधक माहिती समाजापुढे मांडण्याचा मानस आहे. मात्र, अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. देशात अशाप्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच झाला. त्यामुळे त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
...................
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांनी बारणे यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान केला आहे.
मॅक्सिमम कलेक्शन ऑफ व्हिजिटिंग कार्डस् ऑफ म्युनसिपल कापोर्रेशन या नावाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यात बारणे यांनी आजी-माजी नगरसेवकांच्या १२३२ व्हिजिटींग कार्ड, ७६८ फोटोग्राफ आणि २४४ प्रमाणपत्रांचा संग्रह केला आहे.
उपक्रमाविषयी माहिती देताना संभाजी बारणे म्हणाले, ह्यह्यकाही सदस्यांनी त्यांचे व्हिजिटींग कार्ड संदर्भ म्हणून मला दिले होते. या व्हिजिटिंग कार्डचे संकलन करण्याचे ठरविले. त्यावेळी माज्याकडे केवळ पाच टक्के व्हिजिटींग कार्ड होते. त्यानंतर संग्रह करण्याबाबत निश्चय करून नगरपालिका, महापालिका स्थापनेपासून आजपर्यंतची सर्व सदस्यांची व्हिजिटींग कार्ड, फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्त मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून २०१२ व २०१७ मधील महापालिका सदस्यांचे निवडून आल्याचे प्रमाणपत्र माहितीचा अधिकार कायदयान्वये मिळविले. अनेक सदस्यांनी त्यांच्या माहितीचा व अनुभवाचा अनमोल खजिना शब्दरुपाने व कागदोपत्री मला दिला. त्याविषयी लवकरच पुस्तक प्रकाशन करून ती उद्बोधक माहिती समाजापुढे मांडण्याचा मानस आहे. मात्र, अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. देशात अशाप्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच झाला. त्यामुळे त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
...................