Ashadhi Wari: तुकोबा विठुरायाच्या भेटीला! पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज, लाखोंचा मेळा देहूनगरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:51 AM2024-06-28T09:51:53+5:302024-06-28T09:52:38+5:30
यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असून स्वच्छतेला विशेष महत्व
देहूगाव : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. गावातील व पालखी मार्गावरील स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जात आहे. त्यादृष्टीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala)
येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमन मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर, अनगडशहावली दर्गा परिसरात भाविकांची गर्दी आहे. परिसरात तुरळक पाऊस पडत असल्याने भाविकांची राहण्यासाठी तारांबळ उडत आहे. ठिकठिकाणी मोठ्या गृह प्रकल्पांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथेच वारकरी पूजाअर्चा व भजन करीत आहेत. त्यामुळे सध्या देहूत भक्तीमय वातावरण आहे.
प्रस्थान कार्यक्रम!
पहाटे ४.३० - महापूजा
५ ते ७ - काकडा
८ ते ९ - गाथा भजन
१० ते १२ - काल्याचे किर्तन
१२ ते १ - जरीपटका सन्मान
१ ते २ - पादुका पूजन व सत्कार
दुपारी २ - पालखी प्रस्थान
सायंकाळी ६ - पालखी मुक्काम
रात्री ९ ते ११ - किर्तन, जागर
महापालिका तयारी
- शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक
- सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर
- मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा
- दिंडीप्रमुखांचा सत्कार
- पालखी मार्गावर वृक्षारोपण
- फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे
- वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध