विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतिपदक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:06 AM2018-08-15T01:06:58+5:302018-08-15T01:07:11+5:30
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्टÑपतिपदक जाहीर झाले आहे. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलीस सेवेत रुजू झाले.
पिंपरी - पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्टÑपतिपदक जाहीर झाले आहे. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलीस सेवेत रुजू झाले. नाशिकच्या महाराष्टÑ पोलीस अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती भंडारा येथे झाली. गोरेगाव, सालेकसा,
शिवहोरा आदी नक्षली भागात त्यांनी काम केले. नक्षली चकमकीवेळी त्यांनी यशस्वी कामगिरी केली. नक्षली भागातील उत्कृष्ट कामगिरीनंतर परभणी, नांदेड, उस्मानाबाद आदी ठिकाणीही त्यांनी कामगिरीची चुणूक दाखवली. बुलडाणा येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर त्यांनी काम केले आहे.
२००७ ते २०१५ या कालावधीत लातूरमध्ये काम केल्यानंतर १५ जून २०१५ ला त्यांना पिंपरी येथे काम करण्याची संधी मिळाली. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलून गुंडांच्या मुसक्या आवळल्या. चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुन्ह्यांच्या तपासाची विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.