विवेक मुगळीकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:40 PM2017-08-14T18:40:06+5:302017-08-14T18:40:29+5:30

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

Vivek Mughlikar announces the President's Police Medal | विवेक मुगळीकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

विवेक मुगळीकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

googlenewsNext

पिंपरी, दि. 14 - पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी राज्यपाल भवन येथे होणा-या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. 
डॉ. विवेक मुगळीकर 1992 मधे पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी आत्तापर्यंतच्या  कारकीर्दीत 15 पोलीस ठाण्यांमधे त्यांनी काम केले आहे. विशेष कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवत्तापूर्ण सेवेसाठी विशेष राष्ट्रपती पदक त्यांना जाहीर करण्यात आले आहे.
डॉ. मुगळीकर यांच्या प्रमाणेच पुण्यातील पोलीस उपायुक्त बालश्रीराम गणपत गायकर, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक शहाजीराव बाजीराव पाटील, पुणे मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार दौलत माने, सिंहगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार कैलास शंकर मोहोळ, एसआरपीएफचे सहाय्यक पोलीस फौजदार सदाशिव प्रभू शिंदे यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

Web Title: Vivek Mughlikar announces the President's Police Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.