मतदान करा अन् मिळवा आकर्षक गिफ्ट
By Admin | Published: February 21, 2017 02:51 AM2017-02-21T02:51:04+5:302017-02-21T02:51:04+5:30
मतदान हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे. मतदान जसा आपला हक्क आहे; तसेच भारताचे सुजाण
पिंपरी : मतदान हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे. मतदान जसा आपला हक्क आहे; तसेच भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपले ते कर्तव्यही आहे. तेव्हा प्रत्येकाने मतदान हे करायलाच हवे. कारण आपले मतदानच या देशाचे भवितव्य ठरवत असते. आपले एक मत देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी वस्त्रविश्वातील लोकप्रिय नाव असलेले मेन्स अव्हेन्यू पुढे आले आहे. येत्या २१ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेन्स अव्हेन्यू घेऊन आले आहे एक आकर्षक आॅफर. आणि ती म्हणजे मतदान केल्याची निशाणी दाखवा आणि वस्त्र खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा! मतदानाबद्दलची जागरूकता वाढवणे हाच शुद्ध उद्देश यामागे आहे, असे मेन्स अव्हेन्यूचे संचालक सुभाष जैन व अजित जैन म्हणाले.
लक्ष्मी रोड आणि पिंपरीच्या प्राइम लोकेशनवर वसलेल्या मेन्स अव्हेन्यूच्या शोरूममध्ये आपल्याला मनपसंत वस्त्रांचे असंख्य प्रकार आणि पॅटर्न बघायला मिळतात. इंडो वेस्टर्न, सूट्स, जोधपुरी, चुडीदार-कुर्ता, शेरवानी, शटर््स, ट्राउझर्स, टी शर्ट, जीन्स, सुटिंग्ज- शर्टिंग्ज आणि अॅक्सेसरीजने सजलेल्या या परिपूर्ण शोरूमना एकदा भेट द्यायलाच हवी.
तर मग येत्या २१ तारखेला नक्की मतदान करा आणि खरेदीला मेन्स अव्हेन्यूमधे या. आपल्या बोटावरची मतदानाची निशाणी दाखवा आणि मनसोक्त खरेदीसोबत मिळवा आकर्षक गिफ्ट्स. चला मतदान करूया, लोकशाही बलवान करूया! (वा. प्र.)