विकासासाठी शिवसेनेला मत द्या

By admin | Published: February 16, 2017 03:09 AM2017-02-16T03:09:53+5:302017-02-16T03:09:53+5:30

शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. नागरिकांच्या सहकार्याने थेरगाव परिसराचा विकास करण्याची संधी मला मिळाली होती. त्यातून विकास साधला

Vote for Shivsena for development | विकासासाठी शिवसेनेला मत द्या

विकासासाठी शिवसेनेला मत द्या

Next

पिंपरी : शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. नागरिकांच्या सहकार्याने थेरगाव परिसराचा विकास करण्याची संधी मला मिळाली होती. त्यातून विकास साधला आहे. या परिसराचा आणखी विकास करण्यासाठी नागरिकांनी शिवसेनेला मतदान करावे, विकासाला मत म्हणजेच शिवसेनेला मत आहे, असे मत खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या वतीने थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मधून आज पदयात्रा आणि गाठीभेटींवर भर देण्यात आला. या वेळी उमेदवार शालिनी कांतीलाल गुजर, नीलेश बारणे, सचिन भोसले, दीपाली गुजर सहभागी झाले होते. पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत सहभागी होऊन खासदार बारणे यांनी मतदारांना आवाहन केले. ‘खिच के तान धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या फेरीत मोठ्या प्रमाणावर तरुण महिला सहभागी झाल्या होत्या.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘थेरगाव परिसराचा नियोजनबद्ध विकास सुरू आहे. या विकासाला गती देण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेची शक्ती वाढविण्याची गरज आहे. शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. आम्ही केवळ आश्वासने देत नाहीत, तर ती आश्वासने पाळतो. अनधिकृत बांधकामे असो किंवा शास्तीकर असो, जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना आग्रही राहिलेली आहे. आंदोलने केली आहेत.
प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि योगदान वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळे विकासासाठी शिवसेनेला साथ द्या.’’
प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर म्हणाले, ‘‘मावळचे खासदार अप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव परिसराचा विकास झाला आहे. मी शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे.
समाजकारण आणि राजकारण अशा क्षेत्रात आमचे कुटुंब कार्यरत आहे. परिसराच्या विकासासाठी शिवसेनेला साथ द्यायला हवी. सर्व उमेदवारांना विजयी करून शिवसेनेची महापालिकेतील ताकत वाढवायला हवी.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Vote for Shivsena for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.