भाजपातर्फे मतदार संपर्क अभियान
By admin | Published: February 15, 2017 02:09 AM2017-02-15T02:09:07+5:302017-02-15T02:09:07+5:30
प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपा उमेदवार पदयात्रा, रॅली, कोपरासभा, सोसायट्यांमध्ये बैठका याद्वारे मतदारांपर्यंत पोहचत आहेत.
पिंपरी : प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपा उमेदवार पदयात्रा, रॅली, कोपरासभा, सोसायट्यांमध्ये बैठका याद्वारे मतदारांपर्यंत पोहचत आहेत. तसेच वैयक्तिक गाठी-भेटीवर भर देत देऊन संपर्क अभियान राबवित आहेत.
पिंपळे-निलख, जगताप डेअरी, वाकड, कस्पटेवस्ती, विशालनगर प्रभाग २६ मध्ये भाजपातर्फे ममता गायकवाड, आरती चोंधे, संदीप कस्पटे, तुषार कामठे रिंगणात आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आले होते. पदयात्रा आणि कोपरा सभाद्वारे प्रचारास सुरुवात झाली. मात्र, यानंतर आता या उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून व्यक्तिगत गाठीभेटी सुरु केल्या. मतदारांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्याची ग्वाही देत आहेत.
तुषार कामठे प्रभागातील युवा उमेदवार असून, त्यांनी प्रभागातील आणि वाकड परिसरातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्याकडून केलेल्या जनहिताच्या कामांची दखल घेत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. संदीप कस्पटे हे अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत.
तर आरती चोंधे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. प्रभागात त्यांचा जनसंपर्क आहे. सध्या नगरसेवक असलेल्या विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी भाजपाला साथ द्यावी, असे आवाहन उमेदवारांनी केले आहे.
(प्रतिनिधी)