मतदार जनजागृती अभियान

By Admin | Published: February 21, 2017 02:46 AM2017-02-21T02:46:47+5:302017-02-21T02:46:47+5:30

बी पॉझिटिव्ह गु्रप व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये

Voter public awareness campaign | मतदार जनजागृती अभियान

मतदार जनजागृती अभियान

googlenewsNext

पिंपरी : बी पॉझिटिव्ह गु्रप व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यामध्ये शहरात ठिकठिकाणी फ्लोट शोद्वारे मतदानाबाबत प्रबोधन करण्यात आले. या शोमध्ये सोळा फुटी स्टेजवर लाईट, साऊंड सिस्टिमसह एक कलाकार व त्यांचे पथक कार्यरत होते. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून हा हक्क प्रत्येकाने बजाविण्याबाबत आवाहन करण्यात आले.
मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी गाणी स्वरुपात तसेच छोट्या-मोेठ्या नाटिकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ग्रुपचे भाई बांदकर आणि सागर बांदकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक कवी, कलाकार, व्यावसायिक यांनाही मतदानाबाबत आवाहन करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Voter public awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.