By Admin | Published: January 25, 2017 06:53 PM2017-01-25T18:53:09+5:302017-01-25T18:53:09+5:30
मतदार दिवसानिमित्त प्रबोधन फेरी
Next
पिंपरी:भक्ती शक्ती निगडी ते प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी दरम्यान मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विविध ठिकाणी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीसह शिक्षक, प्राध्यापकांसह हजारो युवक युवतींचा सहभाग होता.
मतदार दिनानिमित्त मतदार नोंदणीसाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या उपजिल्हा निवडणूक अधिकारी समिक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, तहसिलदार महेश पाटील, पल्लवी घाटगे, नायब तहसिलदार स्नेहा चाबुकस्वार तसेच सुषमा पैकीकरी व अंजली सावंत यांचा सत्कार केला.
आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते वितरण केले. यामध्ये पथनाटय स्पर्धेत सिंहगड महाविद्यालय वडगाव यांचा प्रथम क्रमांक, डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालयांचा द्वितीय, मॉडर्न कॉलेज आॅफ फार्मसी यांचा तृतीय क्रमांक आला असून महात्मा फुले महाविद्यालय व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. स्किट स्पर्धेमध्ये हिमानी पडलसेकर या डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक, प्राची अगरवाल या एटीएसएसच्या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक तर क्षितीजा साळवे या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये शुभम पोरे, डॉ. डी.वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी आणि दिव्या कुलकर्णी, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांना प्रथम कमांक विभागून दिला. हर्षदा वाबळे, अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय व ज्ञानेश्वर भंडारे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांना द्वितीय क्रमांक विभागून आणि प्रतिकराज बान, प्रतिभा कॉलेज चिंचवड आणि डफळ पूजा प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. व्यंगचित्र या स्पर्धेत प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा कु-हाडे यमनूर, व प्रतिभा कॉलेजची कवडे ज्योती यांना प्रथम क्रमांक, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा अभिषेक बैसाणे व इंदिरा कॉलेज वाकड येथील वृधी चोणकर यांना द्वितीय क्रमांक आणि अश्रृत वाघमारे व मधुरा शंकरपुरे या अनंतराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. कोलाज या स्पर्धेमध्ये प्रतिक्षा हगवणे या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक, धनश्री भागवतकर, प्रतिभा कॉलेज चिंचवड आणि काजल कांबळीने तृतीय क्रमांक आला.