भाजपातर्फे मतदारांच्या भेटीवर भर

By Admin | Published: February 13, 2017 01:47 AM2017-02-13T01:47:40+5:302017-02-13T01:47:40+5:30

पिंपळे गुरव, नवी सांगवी प्रभागामध्ये जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी प्रभाग क्रमांक ३१चे उमेदवार राजेंद्र जगताप, पै. अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले यांनी प्रचार फेऱ्यांवर

The voters will be filled by the BJP | भाजपातर्फे मतदारांच्या भेटीवर भर

भाजपातर्फे मतदारांच्या भेटीवर भर

googlenewsNext

पिंपळे गुरव : पिंपळे गुरव, नवी सांगवी प्रभागामध्ये जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी प्रभाग क्रमांक ३१चे उमेदवार राजेंद्र जगताप, पै. अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले यांनी प्रचार फेऱ्यांवर भर दिला आहे.
प्रचारफेरीत माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, बाळासाहेब देवकर, रावसाहेब चौगुले, सूर्यकांत गोफणे, संजय जगताप, विजूअण्णा जगताप, अरुण पवार सहभागी झाले होते. ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपा विकासात्मक बदल घडवणार आहे. भाजपाने नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत, असे समजून सर्वांनी निष्ठेने भाजपाला साथ द्यावी. या परिसरात विकासासाठी भाजपाचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. भाजपाच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. आगामी काळातही महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम भाजपा करणार आहे, असे आवाहन राजापुरू यांनी केले.
राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘पिंपळे गुरवचा सर्वांगीण विकास केला आहे. यापुढेदेखील पिंपळे गुरवबरोबरच नवी सांगवीचा विकास हेच आपले ध्येय आहे. नाट्यगृहासारख्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. प्रभागात एकूण ३९ हजार मतदान आहे. त्यापैकी आपले पूर्वीचे २३ हजार मतदान आहे. आम्हाला यशाची खात्री आहे.’’ (वार्ताहर)

Web Title: The voters will be filled by the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.