गट, गणांसाठी आज मतदार देणार कौल

By admin | Published: February 21, 2017 02:52 AM2017-02-21T02:52:48+5:302017-02-21T02:52:48+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी मध्यरात्रीनंतर थंडावल्या. जिल्हा परिषदेच्या ५ गट

Voters will be present for the group, Ganpati | गट, गणांसाठी आज मतदार देणार कौल

गट, गणांसाठी आज मतदार देणार कौल

Next

वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी मध्यरात्रीनंतर थंडावल्या. जिल्हा परिषदेच्या ५ गट आणि पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी (दि. २१) तालुक्यातील २१६ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १४२८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य नेण्यासाठी अधिकाऱ्यांची गर्दी झाली होती.
मावळातील काही दुर्गम ग्रामीण गावे ही तहसील कार्यालयापासून ५० ते ५५ किलोमीटर दूर असल्यामुळे अशा गावांतील मतदान केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अधिकारी गडबड करताना दिसत होते.
या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व तहसीलदार जोगेंद्र कट्यारे मार्गदर्शन करत होते. काही समस्या असल्यास त्या मांडण्याचे आवाहनही करत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी एसटी बसची सुविधा करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी २०, तर पंचायत समितींच्या १० जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १ लाख ७६ हजार ३७८ मतदार असून, यामध्ये ९२ हजार ३५३ पुरुष, तर ८४ हजार २५ महिला मतदार आहेत. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे एकूण पाच अधिकारी-कर्मचारी राहणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे तहसील कचेरीत वाटप करण्यात आले. ४३२ ईव्हीएम मशिन, स्टेशनरी, मतदारयादीचे वाटप करण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयातच साहित्य चेक करून घेतले, नंतर ते आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले.
(वार्ताहर)

तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ३ गट, तर पंचायत समितीचे ५ गण संवेदनशील आहेत. यामध्ये इंदोरी-सोमाटणे गटात सोमाटणे, बेबडओहळ ही गावे तर वडगाव- खडकाळा गटात खडकाळा, महागाव -चांदखेड गटात आढे आणि आढले बु ही गावे अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी या केंद्रांवर १०० मीटरवर पोलीस कर्मचारी नियुक्ती व सेक्टर पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी २९३ पोलीस कर्मचारी, ५४ होमगार्ड व १६ पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तालुक्यातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. मतदान करणे हा आपला अधिकार व कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे. तसेच निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी नि:पक्षपणे आपले काम करावे. काही गैरप्रकार आढळल्यास त्वरित मला किवा जवळील पोलिसांशी संपर्क करावा.
- सुभाष भागडे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी

Web Title: Voters will be present for the group, Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.