विविध माध्यमांतून मतदानजागृती

By admin | Published: February 13, 2017 01:53 AM2017-02-13T01:53:53+5:302017-02-13T01:53:53+5:30

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात विविध माध्यमांद्वारे मतदान जनजागृती अभियान राबविले जात आहे. आयुक्त दिनेश वाघमारे

Voting through various media pollution | विविध माध्यमांतून मतदानजागृती

विविध माध्यमांतून मतदानजागृती

Next

पिंपरी : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात विविध माध्यमांद्वारे मतदान जनजागृती अभियान राबविले जात आहे.
आयुक्त दिनेश वाघमारे, सहायक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. यशवंतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू आहे. अभियानांतर्गत दिघी येथील मंगल कार्यालयात सचिन उत्तेकर व माधुरी चव्हाण या नवदांपत्यांनी त्यांच्या विवाह प्रसंगी शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांनी येत्या २१ फेब्रुवारी निवडणुकीमध्ये मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन केले.
महापालिकेच्या निवडणूक प्रसिद्धी कक्षाचे समन्वयक रमेश भोसले व प्रकाश बने यांनी मंगल कार्यालयास मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत भेट दिली.नवदांपत्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.भोसले यांनी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली.
प्रसिद्धी कक्ष प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी भोसरी परिसरात पथनाट्यांची पाहणी केली व नागरिकांना मतदानाविषयी माहिती देऊन मतदानाची जास्तीत जास्त टक्केवारी वाढवावी यासाठी
सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. मतदान प्रचारासाठी विविध माध्यमांचा प्रसिद्धीसाठी वापर केला जात आहे.झोपड्पट्ट्या, भाजी मंडई, मॉल, कामगार ठिय्ये, उद्याने, सोसायट्या, कारखाने, शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालये आणि महाविद्यालये इत्यादी गस्तीच्या ठिकाणी जाऊन पथनाट्ये व पत्रके वाटून जागृती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Voting through various media pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.