वाघोली योजनेचे पाणी मिळणार नाही; पिंपरी पालिकेची मागणी पुणे पालिकेने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:46 PM2017-11-17T14:46:24+5:302017-11-17T15:20:44+5:30

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने अमान्य केली आहे.

Wagholi scheme will not get water; The Pune Municipal Corporation rejected the demand for Pimpri Municipal Corporation | वाघोली योजनेचे पाणी मिळणार नाही; पिंपरी पालिकेची मागणी पुणे पालिकेने फेटाळली

वाघोली योजनेचे पाणी मिळणार नाही; पिंपरी पालिकेची मागणी पुणे पालिकेने फेटाळली

Next
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी इतके पाणी आरक्षितप्रत्यक्ष पाणीवापर आणि लोकसंख्येनुसार लागणारे पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने अमान्य केली आहे. ही योजना पिंपरी महापालिकेला हस्तांतरीत करणे सध्या शक्य नाही, असे स्पष्ट करत पुणे महापालिकेने पाणी देण्यास नकार दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १७ लाख ३० हजार लोकसंख्येला शहराचा पाण्याचा मापदंड १३५ लिटर प्रति माणशी प्रति दिन याप्रमाणे ठरविला आहे. शहराची लोकसंख्या आणि वार्षिक ३.६१ टीएमसी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, शहराची लोकसंख्या सध्या २० लाखाच्या पुढे पोहोचली आहे. त्यानुसार, ६.५५ टीएमसी मंजुर आरक्षणापैकी सध्या ४.८४ टीएमसी इतका पाणीकोटा महापालिकेसाठी मंजुर आहे. २००८ मध्ये महापालिकेला आणखी १.३१ टीएमसी पाणी कोटा मंजुर झाला. मात्र, महापालिकेची टप्पा क्रमांक ४ ही योजना अद्याप कार्यान्वित नसल्याने ४.८४ टीएमसी इतका पाणीकोटा मंजुर आहे. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे जादा पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावर पाटबंधारे विभागाने १३ सप्टेंबर २०१७ रोजी पिंपरी महापालिकेला पत्रच पाठविले.  
पिंपरी महापालिकेचा सध्याचा प्रत्यक्ष वार्षिक पाणीवापर पाच टीएमसी इतका होत आहे. हा पाणीवापर आरक्षित पाणी क्षमतेपेक्षा जादा होत आहे. प्रत्यक्ष पाणीवापर आणि लोकसंख्येनुसार लागणारे पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी पाण्याचा वापर मर्यादित करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीपुरवठा वितरण प्रणाली दुरूस्ती, पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, नवीन वितरणप्रणाली करणे आदी उपाययोजना कराव्यात. भविष्यात आपल्याला वाढीव पाणी मिळणार नाही, असे पाटबंधारे विभागाने या पत्राद्वारे स्पष्ट कळविले. त्यामुळे महापालिकेने पाण्यासाठी इतर स्त्रोत उपलब्ध होतात का याची चाचपणी केली.  वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीवरील रावेत बंधाठयातून अशुद्ध पाणी उपसून चिखली जलशुद्धीकरण वेंष्ठद्रात शुद्ध केले जाते. २७ एमएलडी क्षमतेच्या या योजनेद्वारे चिखली येथील ४० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या उंच टाकीद्वारे पुणे महापालिका हद्दीतील गणेशनगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, खराडी, खांदवेनगर या भांगांना पाणीपुरवठा करण्यात येतो. 
वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेने पुणे महापालिकेकडे केली. त्यावर पुणे महापालिकेने १२ आॅक्टोबर रोजी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. वाघोली पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा काही ठिकाणी सध्या दिवसाआड करण्यात येत आहे. हे पाणीही सध्या अपुरे पडत आहे. त्यामुळे या भागात पुणे महापालिका अन्य स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. त्यामुळे वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी महापालिकेस हस्तांतरण करणे सध्या तरी शक्य नाही, असे पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्राद्वारे कळवत पाणी योजना हस्तांतरण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Web Title: Wagholi scheme will not get water; The Pune Municipal Corporation rejected the demand for Pimpri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.