दूध दरवाढीसाठी प्रतीक्षा, नायगाव येथे शेतक-यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:04 AM2018-01-08T06:04:26+5:302018-01-08T06:04:49+5:30

जागतिक स्तरावर दुधाच्या भुकटीचे भाव गडगडले असल्याने आणि गुजरातमधून महाराष्ट्रात कमी दराने दूधपुरवठा होत असल्याने सहकारी संस्थांचे कमी झालेले दर वाढण्यासाठी शेतक-यांना काही दिवस वाट पाहावी लागेल, असे पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी स्पष्ट केले.

Waiting for milk price, farmers meeting in Naigaon | दूध दरवाढीसाठी प्रतीक्षा, नायगाव येथे शेतक-यांची बैठक

दूध दरवाढीसाठी प्रतीक्षा, नायगाव येथे शेतक-यांची बैठक

Next

कामशेत : जागतिक स्तरावर दुधाच्या भुकटीचे भाव गडगडले असल्याने आणि गुजरातमधून महाराष्ट्रात कमी दराने दूधपुरवठा होत असल्याने सहकारी संस्थांचे कमी झालेले दर वाढण्यासाठी शेतक-यांना काही दिवस वाट पाहावी लागेल, असे पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी स्पष्ट केले.
दूधउत्पादक शेतक-यांची आढावा बैठक नायगाव येथील दूध शीतकरण केंद्रावर रविवारी सकाळी पार पडली. दुधाचे पडलेले भाव वाढवून मिळावे अशी जोरदार मागणी दूध उत्पादकांनी केली. मावळ तालुक्यातील जिल्हा दूध संघाला दूध पुरवठा करणा-या संस्थांना तातडीने कर्ज देण्याची व्यवस्था करणार आहोत,असेनेवाळेयांनीसांगितले. 
दुधाच्या पडलेल्या दराची कारणमीमांसा नेवाळे यांनी विस्तृतपणे मांडली. दूध उत्पादकांनी घाबरून न जाता प्रतिकूल परिस्थितीत ही व्यवसाय टिकवण्यासाठी चिकाटीने उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले. मावळ तालुक्यात ५६ सहकारी दूध उत्पादक संस्था असून या संस्थांना नियमित दूधपुरवठा करणा-या शेतक-यांना नाबार्डकडून सबसिडी देऊन कर्ज देण्याचा विचार आहे. प्रत्येक शेतकºयाला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. शासनाची सबसिडी मिळवून देण्यासाठी दूध उत्पादक संघ पुढाकार घेणार आहे. आयसीआयसीआय बँकसुद्धा जिल्हा संघाला दूधपुरवठा करणाºया शेतक-यांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहे. यासाठी दूधउत्पादक सहकारी संस्थांना त्या शेतक-याबद्दल सहानुभूती व खात्री असली पाहिजे. अशा संस्थांनी संबंधित शेतक-यांच्या नावाने ठराव करून आमच्याकडे दाखल करावा. त्यामुळे सहकारी संस्थांना दूधपुरवठा करणा-या शेतक-यांचा विश्वास वाढेल.

 

Web Title: Waiting for milk price, farmers meeting in Naigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.