रहाटणीतील पदपथ झाले गायब, व्यापाºयांचे अतिक्रमण, काही ठिकाणी वाहने पार्किंगसाठीच पदपथांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:57 AM2017-12-02T02:57:40+5:302017-12-02T02:58:01+5:30

रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याने चालावे लागते. संबंधित परिसरातील रस्त्यावरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तरी पालिकेचे अतिक्रमण

 Walking footpath disappeared, encroachment of business, in some places vehicles use footpaths for parking | रहाटणीतील पदपथ झाले गायब, व्यापाºयांचे अतिक्रमण, काही ठिकाणी वाहने पार्किंगसाठीच पदपथांचा वापर

रहाटणीतील पदपथ झाले गायब, व्यापाºयांचे अतिक्रमण, काही ठिकाणी वाहने पार्किंगसाठीच पदपथांचा वापर

googlenewsNext

रहाटणी : रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याने चालावे लागते. संबंधित परिसरातील रस्त्यावरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तरी पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रस्त्याच्या दुतर्फा बसणारे हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी रस्ता गिळकृंत केला. त्यामुळे या अडचणीत आणखीच भर पडली आहे. या समस्येकडे पालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचा आरोप येथील रहिवासी व वाहनचालक करीत आहेत. चौकात वाढलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे कुणाल आयकॉन रस्ता व शिवार चौकाचा श्वास गुदमरत असून, वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट होत आहे. या रस्त्यावर रुपये लाखो खर्च करून पालिकेने फुटपाथ तयार केले आहे. मात्र याचा फायदा वाटसरूंना न होता येथील हातगाडीवाले, फेरीवाले ,छोटे व्यावसायिक व स्थानिक व्यापाºयांना त्रास होत आहे.
जे नागरिक वर्षाकाठी हजारो रुपये पालिकेचा कर भरतात. त्यांना चालण्यासाठी फुटपाथचा वापर करता येत नाही. मात्र जे हातगाडीवाले, फेरीवाले छोटे व्यावसायिक एक रुपया कर भरत नाहीत. ते मात्र फुटपाथचा पुरेपूर उपयोग करीत आहेत. पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे संतापले आहेत. याच रस्त्यावर अनेक स्थानिक व्यापारी दुकानातील माल सर्रास फुटपाथवर मांडतात. अनेक दुकानदारांनी दुकानाचे शेड रस्त्यावर थाटले आहे. काही दुकानदारांनी पार्किंगमध्येच वाढीव बांधकाम करून दुकाने थाटली आहेत. याकडे पालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी जाणूनबुजून काणाडोळा करीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत.
शिवार चौकाला तर बकालपणा आला आहे. या चौकात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागलेल्या असतात. तसेच शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ अनेक वेळा तेथेच कुठेतरी टाकले जाते. त्यामुळे या चौकात दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे.
रहाटणी फाटा चौकात मजूर अड्डा असल्याने अगदी सकाळी चौकात मोठ्या प्रमाणात मजूर उभे असतात. त्यामुळे चहावाले, नास्तावाले, फळ विक्रते यांच्या इतर व्यवसायाच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात हातगाड्या सर्रास मुख्य रस्त्यावर लागत असल्याने रस्त्याने पायी ये-जा करणाºया नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे.
पिंपरीकडून येणारी बस किंवा इतर वाहनांना रहाटणीकडे जाणाºया रस्त्यावर वळायचे झाल्यास सहा सीटर रिक्षा, तीन सीटर रिक्षा व हातगाडीवाले फेरीवाले, टेम्पोवाले यांनी सर्व रस्ताच काबीज केला असल्याने रस्ता तीन पदरी असूनही वाहनचालकांना रस्ता शोधावा लागत आहे. वाहनचालकांना रस्ताच मोकळा मिळत नसल्याने चौकात वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजच वाहतूककोंडी होऊनही पालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभाग व या भागातील वाहतूक पोलीस विभाग मूग गिळून गप्प असल्याने येथील रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.

नागरिकांची होतेय गैरसोय

रहाटणी चौक ते रहाटणी फाटा या रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ आहे. रहाटणी फाट्यापासून रहाटणीकडे नखाते वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ आहे़ मात्र यावर स्थानिक व्यापाºयांनी आपला कबजा केला आहे. त्यामुळे पायी ये-जा करणाºया नागरिकांना मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मुळात या रस्त्याचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरणाचे काम झाले नाही; त्यामुळे कुठे फुटपाथ आहे, तर कुठे नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुतर्फा अनधिकृत पार्किं ग केलेल्या वाहनांची संख्या जास्त असल्याने इतर वाहनांना ये-जा करण्यास फक्त एकच लेन शिल्लक राहते.

काळेवाडी येथील तापकीर चौक ते पिंपरी पूल या रस्त्याची नाही. या रस्त्यावरील फुटपाथवर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या दोन्हीबाजूने सकाळ- सायंकाळ हातगाडीवाले फेरीवाले छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना ये-जा करणे म्हणजे रस्त्यावर जीव गमावण्या सारखे झाले आहे. अनेक वेळा पालिकेची अतिक्रमण कारवाई करणारे अधिकारी कर्मचारी सर्व फौजफाटा घेऊन जातात. मात्र त्या आधीच हे व्यावसायिक पाल काढतात याचा अर्थ काय, आज कारवाई होणार हे त्या व्यापाºयांना कळते कुठून हा खरा प्रश्न आहे.

अद्याप फुटपाथची प्रतीक्षाच

नखाते वस्ती चौक ते रहाटणी चौक हा रस्ता अद्याप फुटपाथच्या प्रतीक्षेत आहे़ रस्त्यावर चालणाºया नागरिकांना मुख्य रस्त्याचाच आधार घ्यावा लागत आहे. मात्र, प्रगत पालिका हद्दीतील गावांमध्ये अशी भयावह परिस्थिती का असू शकते, असे एक ना अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मनात सतावत आहेत. या रस्त्यावर ना रस्ता दुभाजक ना फुटपाथ मात्र रस्त्याच्या कडेला शंभर टक्के अतिक्रमण अशी परिस्थिती आहे.

दुकानासमोर पोटभाडेकरू ही प्रथा सध्या अनेक दुकानदार अवलंबित आहेत. दुकानासमोरील जागा हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्याकडून ठरावीक रक्कम घेऊन भाड्याने दिली आहे़ त्यामुळे दुकानासमोर फुटपाथ वा रस्ता शिल्लकच राहिला नाही. पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रस्त्यावरील अनेक दुकानदारांच्या समोर पोटभाडेकरू आहेत़ काही ठिकाणी तर एक नव्हे, दोन नव्हे, तीन-चार भाडेकरू ठेवण्यात आले असल्याने रस्त्याची व फुटपाथची जागा व्यापली आहे.

Web Title:  Walking footpath disappeared, encroachment of business, in some places vehicles use footpaths for parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.