वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 15, 2025 13:33 IST2025-01-15T13:31:11+5:302025-01-15T13:33:33+5:30

पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार

walmiki karad owes Pimpri-Chinchwad Municipal Corporation Rs 1.5 lakh in unpaid taxes, municipal corporation will seal the flat | वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर

वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर

पिंपरी : बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड च्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे समोर येत आहेत त्यातच आता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या ६व्या मजल्यावर ६०१ नंबर चा ३.१५ कोटीपेक्षा अधिक किमतीचा ४ बीएचके फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कराड ने या त्याचा फ्लॅट चा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅट वर नोटीस सुद्धा लावली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार आहे, मग त्याचा लिलाव ही केला जाईल. १६ जून २०२१ ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झालेली आहे. मात्र तेव्हापासून वाल्मिक कराडने मिळकत कर थकवला आहे. १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा हा मिळकत कर थकवल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाल्मिक कराडला नोटीस पाठवली आहे. २१ नोव्हेंबर २०२४ला धाडलेल्या नोटिशीनंतर ही कर न भरल्याने आता हा फ्लॅट सील केला जाईल आणि त्यानंतर त्याचा लिलाव ही करण्यात येईल अशी माहिती आहे.

चालू वर्षाच्या मिळकत कर संबंधीचा बिल महापालिकेने यापूर्वीच त्यांना बजावलेले आहे, आणि मिळकत कराच्या बरोबरच त्यांची एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यांना आपण जप्तीपूर्वीची नोटीस देखील दिलेली आहे, त्यांच्याकडे साधारण एक लाख ५५ हजार ४४४ इतकी थकबाकी आहे. त्याप्रमाणे त्यांना २१ नोव्हेंबर २०२४ला जप्ती अधिपत्र देखील दिलेले आहे. साधारणपणे महापालिकेकडे १६ जून २०२१ ला या मालमत्ताधारकांची नोंद झाल्याचे दिसून येते, आणि तेव्हापासून त्यांच्याकडे मालमत्ता करत हा थकीत असलेल्या दिसून येतो  मालमत्ता सील करण्यात येईल, त्यानंतर त्याच्या पुढची लिलावाची पुढच्या प्रक्रियेत सुरुवात होणार आहे.  - अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, महापालिका

Web Title: walmiki karad owes Pimpri-Chinchwad Municipal Corporation Rs 1.5 lakh in unpaid taxes, municipal corporation will seal the flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.