वसीम शेख ठरला ‘ज्यु. महाराष्ट्र २०१९’चा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:28 AM2019-01-09T00:28:40+5:302019-01-09T00:29:25+5:30

शरीरसौष्ठव स्पर्धा : बेस्ट पोझर राज प्रकाश सुर्वे, मोस्ट इमप्रुड बॉडी बिल्डर-सुनीत बंगेरा

Wasim Shaikh became the 'Jew' Maharashtra 2019 Honors | वसीम शेख ठरला ‘ज्यु. महाराष्ट्र २०१९’चा मानकरी

वसीम शेख ठरला ‘ज्यु. महाराष्ट्र २०१९’चा मानकरी

googlenewsNext

तळेगाव दाभाडे : अतिशय अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेत येथील जेडी फिटनेसचा वसीम शेख हा ‘ज्यु. महाराष्ट्र श्री २०१९’ चा विजेता ठरला आहे. जम्मू-काश्मीर येथे १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ज्यु. मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी त्याची राज्यातून निवड झाली आहे.

तळेगाव स्टेशन ‘ज्यु. महाराष्ट्र श्री २०१९’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव आणि फिटनेस स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे आयोजन छत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. संजय मोरे आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जेडी फिटनेसचे जय दाभाडे, रवींद्र काळोखे आणि दिघी येथील अल्टिमेटफिटनेसचे विक्रम भिडे यांनी केले. ४२ वी ज्युनिअर, २५ वी मास्टर्स, १७ वी फिजिकली चॅलेंज, पहिली ज्युनिअर मेन्स क्लासिक बॉडीबिल्डिंग आणि पहिली ज्युनिअर मेन्स फिजिक्स या स्पर्धांमध्ये चांगलीच चुरस होती.

या स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०१९ चॅम्पियन आॅफ चॅम्पियन वसीम शेख (पुणे), बेस्ट पोझर राज प्रकाश सुर्वे (मुंबई), मोस्ट इमप्रुड बॉडी बिल्डर-सुनीत बंगेरा (पश्चिम ठाणे), टीम चॅम्पियनशिप (पश्चिम ठाणे) यांनी चमकदार कामगिरी करीत विशेष नैपुण्य प्राप्त केले. या वेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, गणेश काकडे, अशोक काळोखे, संतोष दाभाडे, रवींद्र दाभाडे, दीपक दाभाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंच म्हणून डॉ. संजय मोरे, राजेश सावंत, राजेंद्र सातपूरकर यांनी काम पाहिले. अनिल धर्माधिकारी आणि राजेंद्र सातपुरकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा निकाल : ५५ किलो वजनगट : प्रथम- विक्रम पाटील (कोल्हापूर), द्वितीय -नीतेश सोडे (पुणे), तृतीय- जुगल शेवाळे (रायगड), चतुर्थ- नरेश पवार (रायगड), पंचम- संजय भोपी (रायगड).
६० किलो वजनगट : प्रथम- तुषार ठाकूर ( मुंबई), द्वितीय- अजित चव्हाण (मुंबई ), तृतीय- योगेश पाटील (रायगड), चतुर्थ-मुनसिंग लगडेवाला (सोलापूर), पंचम- अमोल राऊळ (कोल्हापूर).
६५ किलो वजनगट : प्रथम- भिकाजी कांबळे (कोल्हापूर), द्वितीय- दिलखुश म्हात्रे (रायगड), तृतीय- हिमांशू मकवाना (मुंबई), चतुर्थ- सूरज सकपाळ (कोल्हापूर), पंचम- योगेश गायकवाड (पुणे).
७० किलो वजनगट : प्रथम- सुनीत वंगेरा (पश्चिम ठाणे), द्वितीय- धीरज शिंदे (सांगली), तृतीय- महेश गाडे (सोलापूर), चतुर्थ : शुभम जाधव (कोल्हापूर), पंचम- सूरज पवार (सांगली). मेन्स फिजिक्स : प्रथम- विशाल कौटकर (नाशिक), द्वितीय- आकाश दडमल (पुणे), तृतीय- यश कोळी (मुंबई), चतुर्थ- अमित अंगरे (पश्चिम ठाणे), पंचम- रतवेश सिंग (पश्चिम ठाणे). मेन्स क्लासिक : प्रथम-अजय शेट्टी(पश्चिम ठाणे), द्वितीय- रणजित भोईर (रायगड), तृतीय- अमोल दरगे (मुंबई), चतुर्थ- आदम बागवान (अहमदनगर), पंचम - चिन्मय राणे (पश्चिम ठाणे).

४७५ किलो वजनगट : प्रथम- वसीम शेख (पुणे), द्वितीय-हर्षद मेवेकरी (सांगली), तृतीय- रोहित दळवी (कोल्हापूर), चतुर्थ- आकाश मिरकुटे (कोल्हापूर), पंचम- युवराज मोरे (कोल्हापूर)
४८० किलो वजनगट : प्रथम- राज सुर्वे (मुंबई), द्वितीय- सुशांत किणी (पश्चिम ठाणे), तृतीय- ओंकार साळुंखे (कोल्हापूर), चतुर्थ- हर्षवर्धन लोंढे (सोलापूर), पंचम- सूरज महाराणा (पुणे).
४८५ किलो वजनगट : प्रथम- ओंकार कापरे (कोल्हापूर), द्वितीय- नीतेश सिंग (पश्चिम ठाणे), तृतीय- आकाश इंगळे (सोलापूर), चतुर्थ- जासिफ पठाण (अहमदनगर), पंचम- प्रणव पाटोळे (पुणे )

मास्टर स्पर्धा-
४० वर्षांवरील :
प्रथम- विकटर किणी (पश्चिम ठाणे), द्वितीय- त्रिपाठी शिवअसरी( पश्चिम ठाणे), तृतीय- माणिक जरे(पिंपरी- चिंचवड), चतुर्थ - विश्वनाथ ढोणे (पुणे), पंचम- उत्तम जाधव (मुंबई). ५० वर्षांवरील : प्रथम- संतोष सिंग (पुणे), द्वितीय- नितीन मोरे (पश्चिम ठाणे), तृतीय- सतीश चंद्र (पुणे), चतुर्थ- राजेश बाबर (मुंबई), पंचम- शशिकांत जगदाळे (पालघर), फिजिकली चॅलेंज : प्रथम- योगेश मेहेर(पश्चिम ठाणे, द्वितीय- प्रकाश राजपुरे (पुणे), तृतीय- सागर
चव्हाण (पिंपरी-चिंचवड, चतुर्थ- प्रतीक मोहिते (रायगड), पंचम- अक्षय शेजवळ (मुंबई).

Web Title: Wasim Shaikh became the 'Jew' Maharashtra 2019 Honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.