एकीकडे दिवसा आड तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया :सांगवीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:59 PM2019-05-10T18:59:42+5:302019-05-10T19:01:28+5:30

 एकदिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असतांना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर च्या रस्त्यावर पाण्याचे पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

Wasting millions of liters of water at Sanvi near PCMC | एकीकडे दिवसा आड तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया :सांगवीतील घटना 

एकीकडे दिवसा आड तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया :सांगवीतील घटना 

Next

 एकदिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असतांना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर च्या रस्त्यावर पाण्याचे पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना सांगवी पिंपळे गुरव परिसरात विविध रस्ते खोदकाम व अंतर्गत चेंबर दुरुस्तीसाठी खोदकाम केल्याने अनेक ठिकाणी नळ तुटून पाणी गळती होत असून  अगोदरच महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला असतांना एकदिवसाआड येणारे पाणी गळती होऊन पाण्याची नासाडी व अपव्यय होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

सांगवी पिंपळे गुरव मध्ये गेल्या तीन दिवस पूर्वी सतत दररोज पाणी पुरवठा विभागाकडून लक्ष दिल्याने टाकीतून पाणी वाया गेल्याची घटना ताजी असताना आता परिसरात महापालिका ठेकेदाराकडून विविध ठिकाणी रस्ते दुरुस्ती व चेंबर बसवण्यासाठी खोदकाम केले जात असून काटे पुरम चौक गेल्या तीन महिन्यापासून वाहतुकीच्या कोंडीमुळे अडचणींचा ठरत असून या परिसरातील नेताजी नगर येथील गल्ली क्रमांक दोनच्या शेवटी व राजीव गांधी नगर लागून असलेल्या रस्त्यावर नळ गळतीमुळे पिण्याच्या पाण्याची गळती होत आहे. या भागात रात्री सात वाजता पाणी पुरवठा होत असल्याने महापालिका कर्मचारी व इतर कुणाला याबाबत माहिती मिळत नसल्याने दुरुस्ती रखडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी येथील पाईपलाईन दुरुस्ती लवकरात लवकर करावी व वाया जाणारे पाणी वाचवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Wasting millions of liters of water at Sanvi near PCMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.