शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 02:12 AM2018-12-08T02:12:43+5:302018-12-08T02:12:52+5:30
महापालिकेच्या रावेत येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्र पंपिंग स्टेशनमधील तातडीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी व शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पिंपरी : महापालिकेच्या रावेत येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्र पंपिंग स्टेशनमधील तातडीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी व शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभाग आणि विद्युत विभागातील नियमित दुरुस्ती १३ डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व भागातील गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच १४ डिसेंबरचा सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
शहरामध्ये अनेक भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यातच पाणी बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. ती रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.