नाणे मावळातील वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:56 PM2019-04-02T14:56:10+5:302019-04-02T14:59:42+5:30

मावळासह अनेक भागात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता मागील वर्षी पेक्षा जास्त वाढू लागल्याने अनेक ठिकाणचे पाणीसाठे कमी होण्याची स्थिती आहे. 

The water condition good in the nave Mava vadivale dam | नाणे मावळातील वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा

नाणे मावळातील वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा

googlenewsNext

कामशेत : नाणे मावळातील वडिवळे धरणातून अनेक गावांना तसेच या धरणाचेपाणी इंद्रायणी नदीच्या माध्यमातून अनेक शहरे व गावांपर्यंत पोहचत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाईची चिन्हे दिसत असताना वडिवळे धरण प्रकल्पात मात्र पावसाळ्या पर्यंतचा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पाटबंधारे विभागामार्फत धरणाच्या पाणीसाठ्याचे मंजूर प्राथमिक सिंचन आराखड्यानुसार नियोजन केले असल्याने पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही. अशी माहिती वडिवळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.  
 
मावळासह अनेक भागात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता मागील वर्षी पेक्षा जास्त वाढू लागल्याने अनेक ठिकाणचे पाणीसाठे कमी होण्याची स्थिती आहे. नाणे मावळातील वडिवळे धरणाचा मंगळवार ( दि. २ ) पर्यंत ५४.९५ टक्के भरलेले असून या धरणाचा एकूण पाणीसाठा २७.१८ दश लक्ष घन मीटर एवढा असून त्यातील उपयुक्त पाणी साठा १६.७० दश लक्ष घन मीटर इतका आहे. धरणातून मौजे गोवित्री ते देहूपर्यंत कुंडलिका व इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडून शेती प्रयोजनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठीचे जुलै महिन्यापर्यंतचे नियोजन असल्याची माहिती खाडे यांनी दिली. शिवाय मागणीनुसार, वेळोवेळी शेतीसाठी व पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने परिसरातील नद्या तसेच इंद्रायणी नदीच्या पाणी पातळी योग्य असल्याने त्याचा उपयोग नदी किनारी असलेल्या अनेक गावांना होणार आहे. आजूबाजूच्या गावांना मुबलक पाणी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत आहे.

वडिवळे धरणाच्या पाण्यावर नाणे मावळातील महत्वाची गावे गोवित्री, काम्ब्रे, नाणे या गावांसह कामशेत, कान्हे, वडगाव, तळेगाव, इंदोरी, देहू, निघोजे, चिंबळी, आळंदी, वडगाव शिंदे व तुळापुर आदि महत्वाच्या गावांसह आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावांना पिण्याचा पाणी पुरवठा तसेच शेतीच्या सिंचनासाठी फायदा होत आहे. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांमधील शेती क्षेत्र सिंचनाखाली येत असून धरणातील पाणी साठा मुबलक असल्याने इंद्रायणी नदीतीरावरील गावांना तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. आॅक्टोबर अखेरपर्यंतचे उन्हाळी हंगामाचे पिण्याचे पाणी नियोजन करूनही धरणामध्ये उपयुक्त पाणी साठा शिल्लक राहणार असल्याची माहिती धरण प्रशासन अधिका?्यांनी दिली.

विविध गावांच्या व नागरिकांच्या मागणी नुसार वेळोवेळी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने सध्या तरी पाणी टंचाईचा विषय नाही. शिवाय पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजनामुळे टंचाई निर्माण होणार नाही. पाटबंधारे विभागामार्फत धरणावर पावसाळ्या पूर्वीच्या हंगामी कामांना सुरुवात झाली आहे. यात सुरक्षेच्या दृष्टीने धरणाच्या गेटची तांत्रिक कामे, पावसाळ्या पूवीर्ची देखभाल दुरुस्ती साठी पाहणी तपासणी, याच प्रमाणे लाईट व्यवस्था, धरणाच्या द्वारांची उघडझाप व्यवस्थित होते कि नाही, विद्युत मोटार पाहणी, जनरेटर सर्व्हिसिंग, धरणाच्या भरावावरील खालील बाजूचा कचरा गवत साफसफाई, धरणाच्या भरावावरील ड्रेन व्यवस्थित आहेत का याची पाहणी, धरणाच्या गेटला ओईल ग्रीसिंग, रंगरंगोटी आदी कामे सुरु आहेत. या प्रकारच्या विविध उपाययोजनाच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग कार्यरत असल्याचे अधिका?्यांनी सांगितले.
 

Web Title: The water condition good in the nave Mava vadivale dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.