पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 03:09 AM2018-12-15T03:09:17+5:302018-12-15T03:09:39+5:30

पिंपरी-चिंचवडसाठी साठ एमएलडी पाणी कमी उपसा करावा, याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला सूचना केल्या आहेत. 

Water crisis crisis on Pimpri-Chinchwadkar | पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसाठी साठ एमएलडी पाणी कमी उपसा करावा, याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला सूचना केल्या आहेत. मात्र, महापालिकेने त्यांवर निर्णय घेतलेला नाही. पुण्यात पाणी कमी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर पिंपरीकरांच्या पाण्यावरही संक्रात येऊ शकते.

पाणी उपसाविरोधातील निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने केलेले अपिल जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पुणे महापालिकेवर आली आहे. त्यामुळे पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेवरही पाणीकपातीचे संकट आहे.

पवना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे परतीचा पाऊस झाला नाही. धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणी साठा पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पालिकेने पाचशे एमएलडी उपसा न करता ४४० एमएलडी पाणी उचलावे. पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे पत्र पाटबंधारे विभागाने पालिकेस नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाठविले आहे. मात्र, अद्यापही महापालिकेने पाणी उपसा कमी केलेला नाही. पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतर नियोजन अपेक्षित होते़ मात्र, महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दररोज सुमारे पाचशे एमएलडी पाणी रावेत बंधाऱ्यातून उपसा करीत आहे. पाणीकपात प्रशासनाने सूचविली आहे. मात्र, याबाबत धोरण ठरविण्यात सत्ताधाºयांमध्येच एकमत होत नसल्याचे चित्र आहे. त्यात विरोधकांच्याही विरोधाची भर पडली आहे. अशा परिस्थितीत एकीकडे पाटबंधारे विभागाचे आदेश तर दुसरीकडे राजकीय विरोध अशा कात्रीत पालिका प्रशासन सापडले.

पवना धरणातील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल अकरा टक्क्यांनी कमी झाला आहे. गतवर्षी ८५ टक्के पाणी साठा होता. तर, यंदा ७४ टक्के साठा शिल्लक आहे. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असले तर पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
- प्रवीण लडकत,
कार्यकारी अभियंता,
पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

Web Title: Water crisis crisis on Pimpri-Chinchwadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.