कपातीतही होतोय पाण्याचा अपव्यय

By admin | Published: March 17, 2016 03:16 AM2016-03-17T03:16:00+5:302016-03-17T03:16:00+5:30

शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या

Water dissipation is also being done in the cupboard | कपातीतही होतोय पाण्याचा अपव्यय

कपातीतही होतोय पाण्याचा अपव्यय

Next

भोसरी : शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या सहा जलतरण तलावांवर दररोज साठ हजार लिटरच्या आसपास पाणी लागत आहे. ऐन पाणीकपातीच्या धोरणावर पोहणाऱ्यांच्या हौशीपायी पाण्याचा अपव्यय होत आहे.
शहरात १५ टक्के पाणीकपात आयुक्तांनी जाहीर केली आहे. शहरात एकूण १० तलाव आहेत. त्यातील नेहरुनगरचा जलतरण तलाव बंद आहे. तर थेरगाव येथील जलतरण तलावाचे काम सुरू आहे. असे एकूण आठ जलतरण तलाव सध्या सुरू आहेत. भोसरी, थेरगाव, यमुनानगर, निगडी, मोहननगर, केशवनगर, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी या भागातील जलतरण तलावात पोहणाऱ्यांची गर्दीत वाढ होत आहे.
प्रत्येक जलतरण तलावावर साधारणत: बॅक वॉशसाठी आठवड्यातून एकदा कमीत कमी एक ते दोन हजार लिटर पाणी लागते. सर्व जलतरण तलावांवर बॅक वॉशसाठी १५ ते २० हजार लिटर पाणी
लागत आहे. सहा जलतरण
तलावांवर बोअरवेलच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. जलतरण तलावाचे शॉवरदेखील बोअरवेलच्या पाण्यावरच आहेत. उन्हाळ्यात नागरिक शॉवर्सचा जास्त
वापर करतात. जलतरण तलावाचे पाणी या दिवसांमध्ये जास्त खराब होते असल्याने पाण्याचा जास्त वापर होत आहे.
आठवड्यातून एकदा जलतरण तलावांचे पाणी फि ल्टर करावे लागते. यासाठी जलतरण तलावांना डक्ट बसविलेले आहेत. जलतरण तलाव वॉश केल्यानंतर सर्व घाण डक्टमधून बाहेर पडते. यासाठी तलाव बॅक वॉश करावा लागतो. साधारणत: काही ठिकाणी बॅक वॉशचे पाणी रीसायकल होते. मात्र पाणी रीसायकल करण्याची पद्धत सर्व तलावांवर अवलंबली जात नाही. त्यामुळे बॅक वॉश करतानाही पाण्याचा अपव्यय होत आहे.
सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जलतरण तलावांवर एका बॅचला ८० ते १०० नागरिक पोहण्यासाठी येत आहेत. तलावांवर पोहण्यासाठी गर्दी होत आहे. काही जलतरण तलावांवर तर नागरिकांना प्रवेश देण्यास कठीणाई निर्माण होत आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड ग्रामीणसह काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)

गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पाणीसाठा कमी राहिल्याने दीड महिना जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. सध्या मात्र सर्वसाधारण सभा व स्थायी सभेत तसा निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशासनही अद्यापपर्यंत संभ्रमात आहेत. पुरेसा पिण्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र, साठा संपण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झाला आहे. जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा एवढा गैरवापर का, असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा आहे.

अद्यापपर्यंत जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, पाण्याची कमतरता जाणवल्यास जलतरण तलाव बंद केले जातील. तशी चर्चा सुरू आहे. अद्याप तसा ठराव सर्वसाधारण सभेत झालेला नाही. तशी चौकशी करून हा निर्णय घेण्यात येईल. - दतात्रय फुंदे, सहायक आयुक्त

Web Title: Water dissipation is also being done in the cupboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.