नगरसेवकांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:18 AM2018-09-30T01:18:19+5:302018-09-30T01:18:48+5:30

महापालिकेत बैठक : नागरिकांच्या प्रश्नांनी वैतागले लोकप्रतिनिधी

Water in the eyes of corporators | नगरसेवकांच्या डोळ्यांत पाणी

नगरसेवकांच्या डोळ्यांत पाणी

Next

पिंपरी : पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे वॉर्डातील नागरिकांच्या प्रश्नांचा रोजच भडीमार होत आहे. अधिका-यांना सांगूनही ते ऐकत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी झाल्याची लाज वाटते. आतातरी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी करताना सत्ताधारी भाजपाच्या दोन नगरसेवकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिक वैतागले आहेत. दररोज सारथीवर अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत शनिवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर सचिन चिंचवडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे व काही नगरसेवक व नगरसेविका बैठकीला उपस्थित होत्या.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाही, तोच शहरातील सर्वच भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज ४७० एमएलडी पाणीपुरवठा होत असताना, ऐन गणपती उत्सवात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. तर पुढील महिन्यात नवरात्र, त्यानंतर दिवाळीचा सण आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौरांनी येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
रोजच्या अपुºया पाणी पुरवठ्यामुळे नागरिक आम्हाला विचारणा करतात. त्यांना उत्तरे देता-देता नाकी नऊ येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करताना सत्ताधारी भाजपाच्या पिंपळे सौदागर व पिंपळे निलख भागातील नगरसेवकांच्या डोळ्यांत बैठकीतच अक्षरश: अश्रू तरळले. .

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या कालावधीत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास शहरात चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे विचारधीन आहे. त्यामुळे दररोज ६० एमएलडी पाण्याची बचत होणार असून, अन्य भागात पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होऊ शकतो.
- राहुल जाधव, महापौर

४शहरातील अनधिकृत बांधकामधारक मोठ्या प्रमाणात मोटार पंपद्वारे पाणी खेचतात. तसेच अनधिकृत नळजोडही अधिक आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी नमूद केले.

Web Title: Water in the eyes of corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.