चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 03:15 AM2018-12-14T03:15:50+5:302018-12-14T03:16:03+5:30

टँकरसाठी पाणी येते कोठून, सर्वसामान्यांचा प्रश्न

Water in the grasshopper; Pavet to water on palaces | चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट

चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट

Next

भोसरी : परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे ढग दाटले आहेत. याबाबतचा निर्णय महापालिका स्तरावर होणार असतानाच चºहोलीसह लगतच्या वाड्या-वस्त्यांमध्ये आत्तापासूनच तीव्र पाणी टंचाई सुरु झाली आहे. येथील सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळाला पाणी नसताना टँकरसाठी पाणी येते कोठून, असा सवाल चºहोलीकर करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या चºहोलीने विकासाच्या बाबतीत गेली अनेक वर्षे वनवास भोगला आहे. हा वनवास दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने नितीन काळजे यांना पहिले महापौरपद दिले. त्यांनी चºहोलीच्या विकासासाठी चांगला निधी मिळविण्यात यश मिळवले असले, तरी चºहोलीचा पाणीप्रश्न सोडविण्यात त्यांनाही अपयश आल्याचे वास्तव आहे. चºहोलीसह लगतच्या वाड्या-वस्त्यांवर गणेशोत्सवापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी टॅँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. प्रतिमाणसी १३५ लिटर पाण्याऐवजी १५० लिटर पाणी दिले जात असल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिका करत असली, तरी चºहोलीतील काही भागात हंडाभर पाणी मिळत नाही.

चºहोली परिसरात बांधकामे जोरात आहेत. या प्रकल्पांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. सुमारे अडीच ते तीन हजार रुपये दर आकारून बांधकामांना टँकरद्वारे पाणी मिळते. तर खासगी सोसायट्यांमध्ये पाणी पुरवण्यासाठी दोन हजार रुपये आकारले जात आहेत. नद्या, विहिरींमधून टँकरमध्ये पाणी उचलून काळाबाजार करणाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाईचा येथील काही राजकीय लोकांनी फायदा घेतला आहे. टँकरने पाणी पुरवल्याचे श्रेय घेणारे राजकीय पुढारी चºहोलीला पुरेसे पाणी मिळवून देण्यात मागे पडल्याचे वास्तव आहे.

उन्हाळ्यात भीषणता वाढण्याची भीती
चºहोली गावठाणासह वडमुखवाडी, चोविसावाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, ताजणेवस्ती, बुर्डेवस्ती, दाभाडे वस्ती, साईनगर, जगताप वस्ती, काटे वस्ती या भागात पाणी समस्या तीव्र आहे. पालिकेतर्फे दिवसातून एकदाच पाणी मिळते. तेसुद्धा कमी दाबाने फक्त १५ ते २० मिनिटेच असते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नियोजन न झाल्याने ही परिस्थिती उद््भवली आहे. या भागात टँकर व्यावसायिकांना सुगीचे दिवस आहेत. त्यांच्यासाठीच हा प्रश्न लोंबकळत ठेवला जात नाही ना, अशी साशंकता चºहोलीकर व्यक्त करीत आहेत.

मी महापौर झाल्यावर लगेच भामा आसखेड प्रकल्प तातडीने राबवला पाहिजे यासाठी आग्रही होतो. शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. याशिवाय दिवसाआड पाणीपुरवठा करावा, तरच सर्वांना पाणी पोहोचेल. चार टप्पे पार करून पाणी येत असल्याने पाणी पुरेसे मिळत नाही. लवकरात लवकर भामा आसखेड व आंद्रा प्रकल्प राबवावा यासाठी प्रशासनाकडे आग्रह आहे. - नितीन काळजे, माजी महापौर

गेले वर्षभर पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. कधी पाणीच कमी आहे, तर कधी तांत्रिक कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. पुरेसे मिळणे गरजेचे आहे. रावेत बंधारा, निगडी, गवळीमाथा व त्यानंतर मोशी असे चार टप्पे पार करून पाणी चºहोलीत येत आहे. त्यामुळे चºहोलीला कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका पाणीपुरवठा विभाग सहकार्य करत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. कमी दाबाने पाणी व तेही दररोज नाही अशी परिस्थिती चºहोलीची झाली आहे. - सुवर्णा बुर्डे, नगरसेविका

Web Title: Water in the grasshopper; Pavet to water on palaces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.