पिंपरीत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:48 PM2018-12-20T12:48:48+5:302018-12-20T13:01:25+5:30

आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत...

water problem created Due to unconsciousness of administration | पिंपरीत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी टंचाई 

पिंपरीत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी टंचाई 

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा : सत्ताधारी सदस्यांचा सभात्याग चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणी पश्नावरून वादळी चर्चा झाली. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्यांनी निष्क्रिय प्रशासनामुळे पाणी टंचाई होत आहे. पाणीटंचाईला प्रशासनच जबाबदार आहे, असल्याचे जाहिरपणे सांगितले. पाणीपुरठा विभागावर आयुक्तांचा वचक कमी झाला आहे. आणि आमचाही प्रशासनावरील वचक कमी झाला आहे, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांचा प्रशासनावर वचक नाही आणि सत्ताधारी म्हणून आम्ही आयुक्तांवर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. आयुक्त मलई मिळणारी कामे करण्यात दंग आहेत. त्यांना जनतेच्या हिताच्या कामाचे काही देणेघेणे नाही, असे सांगून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हतबलता प्रकट करून सभात्याग केला. 
महापालिकेच्या स्थायी समितीची तहकूब साप्ताहिक सभा आज झाली. स्थायी समितीत पाणी प्रश्न पेटला होता. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवक सागर आंगोळकर यांनी पाणी टंचाईवर प्रकाश टाकला. भोसरी विधानसभेतील नगरसेवक विकास डोळस हेही आक्रमक झाले. आंगोळकर म्हणाले, विस्कळीत पाणीपुरवठा, विकास कामे केली जात नाही. सत्ताधारी पक्षात असूनही कामे होत नाहीत. पाणीपुरवठ्यावर आवाज उठविल्यास केवळ चार दिवस पाणी सुरळीत होते. चार दिवसानंतर जैसे थे परिस्थिती असते. आमदार वास्तव्यास आहेत, त्याच परिसरात पाणी पुरवठा होत नसेल तर पिंपळेगुरव परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. तसेच या परिसरात विकास कामे देखील केली जात नाहीत. प्रभागात विकासकामांना ब्रेक लावला जात आहे. प्रशासन आम्हाला चालविता येत नाही. भाजपला बदनाम करण्याची आयुक्तांनी सुपारी घेतली की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
डोळस म्हणाले, ह्यह्यदिघी-बोपखेल परिसरात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चार दिवस पाणी येते, चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे दिघी, बोपखेलकर हैराण झाले आहेत.  निवडून आल्यापासून पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने आवाज उठवित आहे. तरीदेखील प्रशासन त्याकडे गांभीयार्ने पाहत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. पंरतु, प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. निष्क्रिीय अधिकाºयांवरही कारवाई व्हायला हवी.
प्रशासन मलईदार कामांत व्यस्त 
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याबद्दल भाजपा सदस्य डोळस यांनी आयुक्तांवर टीका केली. ते म्हणाले, प्रशासन मलईदार कामे करण्यात दंग आहे. त्यांना जनतेशी निगडीत कामाचे काही देणे घेणे राहिले नाही. आयुक्तांचा प्रशासनावर कसलाही वचक नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांच्यावर वचक निर्माण करण्यात कमी पडत आहोत. प्रशासनात सगळा सावळा गोंधळ सुरु असून बजबजपुरी माजली आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळेच शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिका-याला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
डोळस आणि आंगोळकर यांनी प्रशासनावर टीका करून सभात्याग केला. त्यानंतर सभा गुंडाळण्यात आली. प्रशासनाच्या वतीने सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रश्नावर कोणताही खुलासा केला नाही.

Web Title: water problem created Due to unconsciousness of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.