पाण्याच्या टाकीची दुरुस्ती
By admin | Published: May 27, 2017 01:04 AM2017-05-27T01:04:23+5:302017-05-27T01:04:23+5:30
येथील सेक्टर क्र. २२ मधील यमुनानगर, साईनाथनगर, रुपीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : येथील सेक्टर क्र. २२ मधील यमुनानगर, साईनाथनगर, रुपीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली होती. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती सुरू होती. तरी यावर योग्य ती उपाययोजना करण्याबाबतचे वृत्त लोकमतने दि. १९ प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन हजारो लिटर पाण्याची गळती होणाऱ्या टाकीची दुरुस्ती केली आहे.
२० लक्ष लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. परंतु, निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्यामुळे अत्यंत अल्पकाळातच ही टाकी खराब झाली होती. त्यामधून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. टाकीच्या पृष्ठभागावर असलेल्या छोट्या मोठ्या जलवाहिन्यांचीही दुरवस्था झाली होती. यामुळे पाणीगळती मोठ्या प्रमाणात होत होती. २० लक्ष लिटर क्षमतेच्या टाकीतून संपूर्ण सेक्टर क्ऱ २२ निगडी, यमुनानगर, साईनाथनगर रूपीनगर तसेच इतर भागातील दोन ते अडीच लाख लोकसंख्येला पाणी दिले जाते. पंपिंग स्टेशनमधून या टाकीला पाणी पुरवले जाते.
या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हलाच गळती लागली याची प्रशासनाने दखल घेऊन दि. १९ रोजी निगडी सेक्टर क्ऱ २२ मधील पाण्याच्या टाकीच्या दुरवस्थेची बातमी प्रसिद्ध झाली. पाणीपुरवठा अधिकारी तसेच महापालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी या वृत्ताची त्वरित दखल घेतली. दि २४ बुधवारी आणि गुरुवारी निगडी विभागात पाणीपुरवठा बंद ठेवून टाकी संपूर्णपणे रिकामी करून टाकी दुरुस्त करण्यात आली.