शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:21 AM2018-10-29T03:21:15+5:302018-10-29T03:21:29+5:30

नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Water shortage due to planning in the city | शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

Next

पिंपरी : पवना धरणातून रावेतच्या नदीत पाणी सोडले जाते. पिंपरी-चिंचवड शहराला आरक्षणानुसार पाणी सोडले जाते. मात्र, नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून उपसा केंद्राद्वारे पाणी उचलले जाते. रावेतमधील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेला असलेल्या आरक्षणानुसार ८५० एमएलडी ते ११०० एमएलडी पाणी सोडले जाते.

रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाली किंवा रावेत येथील उपसा केंद्राच्या कामासाठी आठवड्यातून एकदा अघोषितपणे म्हणजेच गुरुवारी पाणीकपात केली जाते. दोन दिवसांपूर्वी रावेत बंधाºयातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. दर बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा येणार नाही, असे प्रकटन दिले जाते.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधाºयातून महापालिका पाण्याचा उपसा करते. पाणी शुद्ध करून शहरवासीयांनी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडले जात असले, तरी प्रत्यक्षात रावेतपर्यंत पाणी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परिणामी रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागतात. पाण्याचा उपसा कमी झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. परिणामी पाणी सोडण्याची यंत्रणा विस्कळीत होते. मागील आठवड्यात दोन दिवस सलग पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची ओरड आली, की पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी फक्त कारणे देतात. आज काय बंधाºयाची पातळी कमी झाली, उद्या काय टाक्याच भरल्या नाहीत. वीजपुरवठा खंडित झाला. जलवाहिनी फुटली, अशी कारणे देण्यात अधिकारी माहीर आहेत. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी कारणे देण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. पाणीटंचाई झाली, की ती सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग करीत असतो.

आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून रणकंदन झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपाययोजना जाहीर केल्या होत्या. दहा दिवसांत पाणीपुरठा सुरळीत करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. मात्र, शहरातील अनेक भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. मात्र, अजूनही पाणीपुरवठा विस्कळीत झालेला नाही. आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर दिले जात आहे, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

Web Title: Water shortage due to planning in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.