सणासुदीच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:37 AM2019-03-22T01:37:46+5:302019-03-22T01:38:01+5:30
पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
पिंपरी : पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. होळी सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सणाचा दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत व शोधात गेला.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. त्यानंतर रावेत येथील बंधाऱ्यातून जलउपसा केला जातो. येथे महापालिकेच्या वतीने जलउपसा केंद्र उभारले आहे. पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. परिणामी रावेत येथील बंधाऱ्याची पाण्याची पातळी कमी झाली. धरणातून बंधाºयात येणारे पाणी कमी झाल्याने जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागले. त्यामुळे शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्या भरू शकल्या नाही. परिणामी मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. चिंचवड, आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात सायंकाळी सहाला येणारे पाणी रात्री अकरानंतर सोडण्यात आले होते. तर होळीच्या दिवशीही शहर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांचा कालखंड लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
कमी वेळ पाणी सोडल्याचा परिणाम
विद्युत निर्मिती करणाºया यंत्रणेत बिघाड झाल्याने दररोज सुमारे सहा ते सात तास पाणी सोडण्यात येते. ते पाणी दोन ते तीन तास सोडण्यात आले. परिणामी रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली. धरणातून कमी वेळ पाणी सोडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी शहराच्या विविध भागांत होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता. परिणामी नागरिकांना सणाच्या दिवशीच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्याने रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे जलउपसा करणारे पंप बंद करावे लागले. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. तसेच बुधवारीही याचा परिणाम जाणवला. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे.
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग