सलग तिस-या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:06 AM2018-02-22T03:06:59+5:302018-02-22T03:09:27+5:30
तांत्रिक सबब पुढे करून रोजच पाणीपुरवठा समस्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले जात आहे. आणखी किती दिवस नागरिकांनी हाल सोसायचे, असा प्रश्न थेट स्थायी समितीत
पिंपरी : तांत्रिक सबब पुढे करून रोजच पाणीपुरवठा समस्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले जात आहे. आणखी किती दिवस नागरिकांनी हाल सोसायचे, असा प्रश्न थेट स्थायी समितीत नगरसेविकांनी विचारला. त्यावर उत्तर देताना आणखी पुढील ४८ तास शहरात पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार आहे, असे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप केले.
पाणीपुरवठा समस्या निर्माण झाली यास यापूर्वी जे सत्तेवर होते, तेच जबाबदार आहेत. सध्याच्या सत्ताधाºयांविरुद्ध ओरड करून उपयोग नाही. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प कोणामुळे रखडला, हे लक्षात घ्या, असे स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी पाणीपुरवठ्याबद्दल ओरड
करणाºया राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना सांगितले. धरणाची खोली वाढविण्याचा प्रयत्न करणाºया खासदारांना हा प्रश्न सोडविण्यास सांगा, असाही सल्ला सावळे यांनी दिला.