पवना धरण शंभर टक्के भरले म्हणून काय झाले; पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआडच पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 08:35 PM2020-09-25T20:35:29+5:302020-09-25T20:39:49+5:30

धरण भरलेले असले तरीदेखील पाणी कपातीपासून शहरवासीयांची सुटका नाही.

The water supply of Pimpri Chinchwad city will be maintained during the day | पवना धरण शंभर टक्के भरले म्हणून काय झाले; पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआडच पाणीपुरवठा

पवना धरण शंभर टक्के भरले म्हणून काय झाले; पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआडच पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देजूनपासून धरण क्षेत्रात १६८४ मिली मीटर पावसाची नोंद

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र दिवसाला पाणीपुरवठा नियमित केला जाणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. ३० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत नाही, तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिली होती. जून, जुलैमध्ये धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता.  त्यामुळे पाण्याचे संकट वाढण्याची चिन्हे होती. ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑगस्टअखेर पवना धरण शंभर टक्के भरले. जूनपासून धरण क्षेत्रात १६८४ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर ६७.१३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली. आज धरणात ९९.७० टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ३८७० मिलीमीटर पाऊस झाला होता.  
..................
 धरण भरले असले. दहा महिन्यापासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. पाणी कतापीपासून शहरवासीयांची सुटका नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत  नोव्हेंबर २०१९ पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. धरण १०० टक्के भरल्यानंतरही पाणी कपात कायम राहणार आहे. वाढीव पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
......... 

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ''धरणात ९९.७० टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. पिंपरी- चिंचवडसाठी बाराशे क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाणी कमी होत आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस थांबला असला तरी धरणात पाणी साठा कमी होत नाही.'

 ............ 
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे म्हणाले, ''पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. पालिका नदीतून पाणी उचलत आहे. शहरासाठी महिन्याला ११टक्के पाणी लागते. त्यानुसार १५ जुलै २०२१ पर्यंत धरणातील पाणीसाठापुरेल.  
 ................... 
पाणी साठा
जूनपासून झालेला पाऊस १६८४ मिली मीटर गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस  ३८१७ मिली मीटर धरणातील सध्याचा पाणीसाठा ९९.७० टक्के गेल्या वर्षी आज पाणीसाठा १०० टक्के जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ ६४.७१ टक्के

Web Title: The water supply of Pimpri Chinchwad city will be maintained during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.