पाणीकपातीची अजित पवारांची सूचना
By admin | Published: September 6, 2015 03:29 AM2015-09-06T03:29:22+5:302015-09-06T03:29:22+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ७५ टक्केच पाणीसाठा आहे. वर्षभराचा विचार करता आत्तापासूनच पाणीकपातीचे नियोजन करावे लागणार आहे. यामुळे दैनंदिन
Next
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ७५ टक्केच पाणीसाठा आहे. वर्षभराचा विचार करता आत्तापासूनच पाणीकपातीचे नियोजन करावे लागणार आहे. यामुळे दैनंदिन पाणीपुरवठ्यात कपात करावी लागणार असल्याची सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. ते म्हणाले, ‘‘पाऊस लांबल्याने पुण्याला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्येही आजपर्यंत ७५ टक्केच जलसाठा आहे. हे पाणी पुढील १५ जुलै २०१६पर्यंत पुरविणे आवश्यक आहे. यासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)