जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीबाणी

By Admin | Published: May 24, 2016 05:55 AM2016-05-24T05:55:24+5:302016-05-24T05:55:24+5:30

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीपातळी घटत असल्याने महापालिकेने पाणीकपात केली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केला असला, तरी त्यानुसार जुलै

Waterfall if the rain fails till July | जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीबाणी

जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीबाणी

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीपातळी घटत असल्याने महापालिकेने पाणीकपात केली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केला असला, तरी त्यानुसार जुलै अखेरपर्यंत शहराची तहान भागू शकेल. मात्र, हवामानाचे अंदाज दिवसेंदिवस बदलत असून, जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास शहरावरही पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पाणीकपातीचे नियोजन हाती घेतले. मागील पावसाळ्यात पवना धरण क्षेत्रात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. हा पाणीसाठा वर्षभर पुरविणे अशक्य असल्याने महापालिकेने ९ डिसेंबर २०१५ला शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली. त्यानंतर ११ मार्च २०१६ मध्ये १० टक्क्यांवरून ही पाणीकपात १५ टक्क्यांवर नेण्यात आली होती. दरम्यान, पाणीपातळी जास्त खालावू लागल्याने तसेच जूनमध्ये पावसाचा नेमका अंदाज नसल्याने ३ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरूकरण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी धरणात २.१९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तर सध्या पवना धरणात केवळ १.७७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दर दिवशी २१ दशलक्ष घनफूट लिटर पाण्याचा विसर्ग होतो.
सध्याचा पाणीसाठा शहराला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, सध्या उपलब्ध पाणीसाठ्यात महापालिका दिवसाला ३०० ते ३१५ एमएलडी पाणी उचलत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) दरदिवशी ८० एमएलडी, तसेच वाघोलीसाठी दरदिवशी ३० एमएलडी पाणी उचलले जात आहे. यासह तळेगाव, देहूरोड या मोठ्या शहरांसह पवना धरणापासून ते रावेत बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रालगत शेतीसाठीही पाणी उचलले जाते. (प्र्रतिनिधी)

सध्या १.७७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच १७५६ दशलक्ष घनफूट लिटर पाणीसाठा आहे. यातून दर दिवशी २१ दशलक्ष घनफूट विसर्ग होत आहे. यापैकी १६ दशलक्ष घनफूट महापालिका आणि औद्योगिकसाठी असून, ४ दशलक्ष घनफूट शेतीसाठी आणि वहनात जाते. सध्याचा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरू शकेल.- मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवना धरण

Web Title: Waterfall if the rain fails till July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.