आम्ही सगळे भाऊ, सारे मिळून खाऊ - श्रीरंग बारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:24 PM2018-08-27T23:24:51+5:302018-08-27T23:25:35+5:30

भ्रष्टाचाराविरोधात तोंड कधी उघडणार?

We all eat together all the brothers - Shrirang Barane | आम्ही सगळे भाऊ, सारे मिळून खाऊ - श्रीरंग बारणे

आम्ही सगळे भाऊ, सारे मिळून खाऊ - श्रीरंग बारणे

Next

पिंपरी : ‘आम्ही सगळे भाऊ सारे मिळून खाऊ’ असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. स्वत: किती पक्ष बदलले हे कदाचित त्यांना आठवतही नसेल. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपावासी झालेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी दुसºया विषयी बोलणे हा मोठा विनोद आहे. पालिकेतील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमण यावर गेल्या वर्षभरात जगतापांनी एकदाही तोंड उघडले नाही. ‘लोगों की समस्यों की बात उठाने पर आमदार जगताप को गुस्सा क्यो आता है?’ असा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला.

खासदार बारणे यांनी आयुक्तांसमवेत शुक्रवारी बैठक घेऊन शहरातील अतिक्रमण, कचरा, पाण्याच्या समस्या मांडून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे प्रश्न सोडविण्यात प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका केली होती. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी बारणे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर बारणे यांनी आज पुन्हा टीका केली.

केंद्राच्या योजनांसाठी काय पाठपुरावा केला हे भाजपाच्या मंत्र्यांना विचारा. तेच तुम्हाला सांगतील. निवडणुकीत खोटी आश्वासने व गाजर दाखवून निवडणुका मी लढवल्या नाहीत. दीड वर्षात शहरातील प्रश्नाबाबत आलेले अपयश, भ्रष्टाचाराचे होणारे आरोप, नियोजनशून्य कारभार, हप्तेवसुली, शहराच्या रस्त्यांना आलेले बकालपणाचे स्वरूप, ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने भरल्या जाणाºया निविदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आरोप करून सत्ता मिळवूनही एकही आरोप सिद्ध करता आला नाही. मात्र, तुम्ही तर सत्तेचा बाजार चालवला असून, भ्रष्टाचार आणि ‘खाबूगिरी’ यातच तुम्ही गुरफटले असल्याने शहरातील नागरिकांच्या समस्येचा विसर तुम्हाला पडलेला आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार

Web Title: We all eat together all the brothers - Shrirang Barane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.